फलकाच्या माध्यमातून उलगडला कर्मवीरांचा जीवनपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:46 AM2021-09-23T04:46:12+5:302021-09-23T04:46:12+5:30
ठाणे : शिक्षणाची ज्ञानगंगा गोरगरिबांपर्यंत पोहोचविणारे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना १३४ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. ...
ठाणे : शिक्षणाची ज्ञानगंगा गोरगरिबांपर्यंत पोहोचविणारे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना १३४ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी केबीपी महाविद्यालयात लावण्यात आलेल्या फलकाच्या माध्यमातून कर्मवीरांचा जीवनपट उलगडण्यात आला.
कमवा आणि शिका, असा संदेश देऊन शिक्षण क्षेत्रात नवीन दिशा देणाऱ्या कर्मवीरांची बुधवारी केबीपी महाविद्यालयात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी त्यांचा जीवनप्रवास उलगडणाऱ्या फलकाचे आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन मोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कर्मवीरांचे जीवनचरित्र विद्यार्थ्यांना कळावे, त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची माहिती व्हावी यासाठी हे फलक महाविद्यालयात लावले असल्याचे मोरे म्हणाले. या फलकावर कर्मवीरांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य, त्यांचे जीवन व शिक्षण, त्यांचे पुरस्कार आदी माहिती देण्यात आली आहे. उद्घाटनप्रसंगी उपप्राचार्य प्रा. संतोष गावडे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.