बिऱ्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर; मोर्चेकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन, २ तासापासून रस्ता जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 01:26 PM2023-06-15T13:26:13+5:302023-06-15T13:26:49+5:30
बिऱ्हाड मोर्चाला मंगळवारी सकाळी सुरुवात झाली होती.
कसारा, शाम धुमाळ: राज्यभरातील आदिवासी विकास विभागातील रोजंदारी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांचा मुंबई येथील मंत्रालयाकडे निघालेला बिऱ्हाड मोर्चा इगतपुरीत मुक्कामी स्थिरावला आहे. नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथून विविध मागण्यासाठी या बिऱ्हाड मोर्चाला मंगळवारी सकाळी सुरुवात झाली होती.
शाळेतील आणि वसतिगृहातील रोजंदारी वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचारी यांचा हा बिऱ्हाड मोर्चा असुन दिनांक २५ मे २०१३ रोजीचे आदिवासी विकास विभागाचे शासन पत्र रद्द करावे, दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर बाहेरील कर्मचाऱ्यांना घेऊ नये, दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांना दहा वर्षे पूर्ण होईपर्यंत शासन सेवेत संरक्षण देण्यात यावे तसेच त्यांना सेवेतून कमी करू नये अशा प्रमुख मागण्या या मोर्च्याकरांच्या आहेत. विशेष म्हणजे दुपारच्या सुमारास काही वेळा जोरदार पावसाच्या सरी कोसळल्यामुळे मोर्चेकरी चिंब भिजले होते.
आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला सिटु संघटनेने पाठींबा दिला असुन मुंबईच्या दिशेने रावांना होण्यासाठी मुबईच्या वेशीवर दाखल झाला आहे.मुंबई ची वेस असलेल्या कसारा घाटात हा मोर्चा आला असून. सरकारने त्यांच्या मागण्यांचा विचार करून ताबडतोब निर्णय घ्यावा ही मागणी करून या मोर्चाला विविध संघटनानी पाठिंबा दिला आहे. . या मोच्यात मोठ्या प्रमाणावर महिला लहान मुले व अपंग युवक आहेत. गुरुवाई सकाळी हा बिऱ्हाड मोर्चा महामार्गावरील कसारा घाटात दाखल झाला असून पुढे निघाला आहे.
अरे या सरकारचे करायचं काय खाली डोक वर पाय अशा अनेक घोषणा देऊन सरकारचा धिक्कार केला. हजारो मोर्चे करांनी अचानक मुबई नाशिक व नाशिक मुबई महामार्गांवरील दोन्ही कसारा घाटात रस्ता रोको केला असून वाहणांच्या लाबाचं लांब रांगा लागल्या होत्या.