बिर्ला महाविद्यालयाचे आत्मसंरक्षण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:35 AM2021-03-14T04:35:27+5:302021-03-14T04:35:27+5:30

कल्याण : बी. के. बिर्ला महाविद्यालयाच्या व्यवस्थापन विभागातर्फे महिला दिनाचे औचित्य साधून सोमवारी विद्यार्थिनींना प्रोत्साहित व प्रशिक्षित करण्यासाठी प्राथमिक ...

Birla College Self Defense Camp | बिर्ला महाविद्यालयाचे आत्मसंरक्षण शिबिर

बिर्ला महाविद्यालयाचे आत्मसंरक्षण शिबिर

Next

कल्याण : बी. के. बिर्ला महाविद्यालयाच्या व्यवस्थापन विभागातर्फे महिला दिनाचे औचित्य साधून सोमवारी विद्यार्थिनींना प्रोत्साहित व प्रशिक्षित करण्यासाठी प्राथमिक स्वसंरक्षण उपक्रम आभासी पद्धतीने राबविण्यात आला. या शिबिराची नोंद ‘लिमका बुक’मध्ये व्हावी तसेच आत्मसंरक्षणाचे धडे व महत्त्व समाजात सर्व घटकांपर्यंत जावे, यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील आहे.

महाविद्यालयाने सोमवारी सकाळी १०.१५ ते १०.५० या वेळेत ‘सर्वांत जास्त प्रशिक्षणार्थी-आभासी शिबिर’ या शीर्षकाखाली मायक्रोसॉफ्ट टीमद्वारे हा उपक्रम राबविला. त्यात २९१ मुली व सात अध्यापकांनी आपला सहभाग नोंदविला. या वेळी सहभागी विद्यार्थिनींना ‘आत्मसंरक्षणाचे धडे व महत्त्व’ याबाबत माहिती देण्यात आली. आंतरराष्ट्रीय तायक्वोंडो खेळाडू, राष्ट्रीय पंच आणि डॅन ब्लॅक बेल्ट असलेल्या रेवती हुंसवाडकर यांनी विद्यार्थिनींना तीन प्रकारचे कौशल्य, दोन प्रकारचे स्वसंरक्षण आणि तीन प्रकारच्या मुष्ठी प्रात्यक्षिकांद्वारे स्वसंरक्षणाची ओळख करून दिली.

या शिबिराचा उपयोग आत्मविश्वास व सकारात्मक व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी होईल, असे मत महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ओ. आर. चितलांगे यांनी व्यक्त केले. दरम्यान, संचालक डॉ. नरेशचंद्र, प्राचार्य डॉ. अविनाश पाटिल, उपप्राचार्या इस्मिता गुप्ता, विभागप्रमुख अनिल तिवारी आणि सहकारी अध्यापक अरनॉल्ड जथाना, सूरज अगरवाला, रिंकी राजवानी आणि नव्या प्रेमदर्श यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले.

-----------

Web Title: Birla College Self Defense Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.