बिर्ला कॉलेजच्या ‘नो व्हेइकल डे’चा नागरिकांना त्रास
By Admin | Published: December 6, 2015 12:34 AM2015-12-06T00:34:34+5:302015-12-06T00:34:34+5:30
वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसावा व वाहनांशिवाय कॉलेजात येण्याची सवय विद्यार्थ्यांना लागावी, या उदात्त उद्देशाने बिर्ला कॉलेजने नो व्हेइकल डे सुरू केला. काही विद्यार्थी
कल्याण : वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसावा व वाहनांशिवाय कॉलेजात येण्याची सवय विद्यार्थ्यांना लागावी, या उदात्त उद्देशाने बिर्ला कॉलेजने नो व्हेइकल डे सुरू केला. काही विद्यार्थी त्याचे पालन करीत असले तरी काहींकडून त्याचे पालन होत नाही. त्याचा त्रास कॉलेज परिसरात राहणाऱ्या नागरिकांना होत आहे. या त्रासामुळे त्यांनी थेट कॉलेजात धाव घेऊन कॉलेजच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र, कॉलेज प्रशासनाने टाळे ठोकल्याच्या घटनेचा इन्कार करून या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तेव्हा कुठे नागरिकांचा संताप निवळला आहे.
वाहनांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी कॉलेजने नो व्हेइकल डे सुरू केला. तो महिनाभरातून एकदा पाळला जातो. काही विद्यार्थी तो काटेकोरपणे पाळतात. मात्र, काही उनाड विद्यार्थी त्याचे पालन करीत नाही. कॉलेज हे कोकण वसाहतीला लागून आहे. नो व्हेइकल डे मुळे विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये वाहन
आणले तरी ते पार्क करू दिले जात नाही. नो व्हेइकल डे न पाळणारे विद्यार्थी आपली वाहने
कोकण वसाहत परिसरात कुठेही रस्त्यावर पार्क करतात. त्यामुळे नो व्हेइकल डे च्या दिवशी विद्यार्थ्यांच्या बेकायदा वाहन पार्किंगचा त्रास नागरिकांना होतो.