उल्हासनगरातील बिर्ला विठ्ठल मंदिर रोषणाईने सजले; गोलमैदानात रामजन्मभूमी मंदिराची प्रतिकृती
By सदानंद नाईक | Published: January 21, 2024 06:58 PM2024-01-21T18:58:28+5:302024-01-21T18:58:42+5:30
शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महापूजाचे आयोजन करून सायंकाळी शोभायात्रा काढली आहे.
उल्हासनगर: रामजन्मभूमी सोहळ्याच्या निमित्त प्रसिद्ध बिर्ला विठ्ठल मंदिर रंगीबेरंगी रोषणाईने उजळून निघाले असून गोलमैदानात रामजन्मभूमी मंदिराची प्रतिकृती उभी केली. तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने महापूजाचे आयोजन करून सायंकाळी शोभायात्रा काढली आहे.
उल्हासनगर रामजन्मभूमी मुख्य सोहळ्यापूर्वी भगव्या पताका, झेंडे आदीने राममय झाले असून विविध राजकीय पक्षाने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेले बिर्ला विठ्ठल मंदिर रंगीबेरंगी रोषणाईने उजळून निघाले असून नागरिकांनी मंदिर दर्शनासाठी गर्दी केली आहे. तर भाजपने गोलमैदानात रामजन्मभूमी मंदिराची प्रतिकृती मंदिर उभारले असून त्याठिकाणी सलग १ फेब्रुवारी पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती भाजप शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी दिली. गेल्या १५ दिवसापासून मंदिराची उभारणी केली जात होती. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने गोलमैदान येथील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संपर्क कार्यालय व शहाड फाटक येथे महापूजेचे आयोजन केले. तसेच शोभायात्रेचे आयोजन केले होते.
महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, शहरप्रमुख राजेंद्र सिंग।भुल्लर, रमेश चव्हाण यांच्यासह पक्ष पदाधिकारी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमात सहभागी झाले होते. रामजन्मभूमी सोहळ्याची दिवसी सोमवारी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केले आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख रमेश चव्हाण यांनी संभाजी चौक व लालचक्की चौक परिसरात लाडूचे वाटप केले. तर मनसेचे नेते प्रदीप गोडसे यांनी लालचक्की चौकात रामजन्मभूमी मंदिराचा देखावा उभारला असून नागरिकांनी देखावा पाहण्यासाठी गर्दी केली आहे.