आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:48 AM2021-09-07T04:48:34+5:302021-09-07T04:48:34+5:30
ठाणे : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि नवबौद्ध अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी डॉ. ...
ठाणे : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि नवबौद्ध अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, कृषी सभापती संजय निमसे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, वीज जोडणी आकार, पंप संच, इनवेल बोअरिंग, सूक्ष्म सिंचन संच, तुषार संच, ठिबक सिंचन, परसबाग, पीव्हीसी, एचडीपीई पाईप, आदींचा लाभ देण्यात येणार आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेकरिता लाभार्थ्याकडे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. नवीन विहिरीचा लाभ घ्यावयाचा असल्यास लाभार्थ्याकडे किमान ०.४० हेक्टर जमीन आवश्यक आहे. इतर लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याकडे किमान ०.२० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक. लाभार्थ्याचे स्वत:चे बँक खाते त्याच्या आधारकार्डशी संलग्न असावे. लाभार्थ्याचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा जास्त नसावे, तहसीलदारांकडून अद्ययावत उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे.