लोककवी वामन कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षास कल्याणमधून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:45 AM2021-08-13T04:45:51+5:302021-08-13T04:45:51+5:30

कल्याण : लोककवी वामन कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षास कल्याणमध्ये सुरुवात होत आहे. शहरातील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात १४ ऑगस्टला ज्येष्ठ ...

The birth centenary year of folk poet Vaman Kardak started from Kalyan | लोककवी वामन कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षास कल्याणमधून सुरुवात

लोककवी वामन कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षास कल्याणमधून सुरुवात

Next

कल्याण : लोककवी वामन कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षास कल्याणमध्ये सुरुवात होत आहे. शहरातील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात १४ ऑगस्टला ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती पु. ल. कट्ट्यातर्फे देण्यात आली.

यावेळी कल्याण पश्चिमेचे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर, ज्येष्ठ कवी प्रा. प्रशांत मोरे, साहित्यिक गिरीष लटके, ज्येष्ठ नाट्य अभिनेते आणि कवी सुधीर चित्ते आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनावेळी वामन कर्डक यांच्या गावचे सरपंच दत्ताराम डोमाडे, जे. जे. आर्ट स्कूलचे गणेश तरतरे, कायद्याने वागा चळवळीचे प्रमुख राज असरोंडकर आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी कविसंमेलन होणार असून, त्यात अरुण म्हात्रे, प्रशांत वैद्य, रमेश आव्हाड, किरण येले, प्रशांत मोरे, संदेश ढगे, वृषाली विनायक आणि आकाश पवार आदी सहभागी होणार आहेत.

पु. ल. कट्टा ही संस्था कल्याणमध्ये दोन दशके साहित्यिक आणि सामाजिक कार्य करत आहे. पु. ल. देशपांडे आणि वामन कर्डक हे समकालीन होते. लोककवी वामन कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी कवी किरण येले, तर कार्याध्यक्षपदी कवी प्रा. प्रशांत मोरे काम पाहणार आहेत. कर्डक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर कार्यक्रम होणार आहेत. त्यात उद्घाटन सोहळा, जलसा, विविध स्पर्धा, शॉर्ट फिल्म, वामनदादा कर्डक गीत गायन स्पर्धा, चित्रकला, कॅलीग्राफी, एकांकिका, आठवणी संकल्प, परिसंवाद, कवयित्री संमेलन, प्रज्ञावंतांच्या सहवासात १० कार्यक्रम घेतले जाणार आहेत. त्याचे स्वरूप ऑफलाइन व ऑनलाइन असे दोन्ही प्रकारचे आहे. त्यात राज्यातील १० जिल्हे सहभागी होणार आहेत.

कर्डक यांच्या गावापासून निघणार दिंडी

कर्डक यांच्या गावातून डिसेंबर २०२१ मध्ये दिंडी काढली जाईल. ही दिंडी, नाशिक, जळगाव, अमरावती, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, ठाणे येथून जाऊन तिची सांगता जानेवारी २०२२ कल्याणमध्ये होईल.

----------------------

Web Title: The birth centenary year of folk poet Vaman Kardak started from Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.