अंबरनाथ एमआयडीसीतील बिस्कीट कंपनीला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 08:37 AM2021-03-11T08:37:32+5:302021-03-11T08:51:14+5:30
गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील कंपन्यांना आगी लागण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील कंपन्यांना आगी लागण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अंबरनाथ एमआयडीसीत बिस्कीट कंपनीला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचे जवान त्यावर नियंत्रण मिळविण्य़ाचे काम करत आहेत. (Fire breaks out at a factory in the Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) area of Ambernath, Thane. )
अंबरनाथ एमआयडीसी भागातील आर. के बेकवेलमार्क या बिस्किट बनवणाऱ्या कंपनीला पहाटे भीषण आग लागली. सुदैवाने महाशिवरात्रीची सुट्टी असल्या कारणाने कारखाना बंद होता त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.
अंबरनाथ आनंद नगर एमआयडीसी मध्ये ही कंपनी असून या कंपनीला पहाटे सहा वाजता अचानक आग लागली. अवघ्या काही मिनिटातच संपूर्ण कंपनी या आगीच्या कचाट्यात सापडली. आगीची माहिती मिळताच आनंद नगर एमआयडीसी चे अग्निशामक दल तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. यासोबतच बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर आणि कल्याण सह तळोजा एमआयडीसीतील अग्निशामक गाड्या देखील घटनास्थळी दाखल झाल्या. चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे. महाशिवरात्रीची सुट्टी असल्याने कंपनीत सुरक्षा रक्षक वगळता कोणताही कामगार नव्हता. त्यामुळे कोणालाही इजा झालेली नाही. या आगी मागचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.
दोन दिवसांपूर्वीच आसनगाव येथील प्लॅस्टिक कंपनीला आग लागली होती. यामध्ये तीन युनीट जळून खाक झाले होते. तर कळवा मनीषानगर येथील सुधाम कृष्णा इमारती मधील मीटर बॉक्सला सोमवारी मध्यरात्री अचानक आग लागली होती. यामध्ये त्या इमारतीमधील ३२ मीटर बॉक्स जाळून खाक झाले होते.
Maharashtra: Fire breaks out at a chemical factory in the Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) area of Ambernath, Thane. Firefighting operation underway. No casualties reported. pic.twitter.com/w3fhIAVWRo
— ANI (@ANI) March 11, 2021
हिंगणा एमआयडीसी परिसरात असलेल्या विको कंपनीला रविवारी (दि. 7) रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत प्राणहानी झाली नसली तरी कंपनीचे 70 टक्के नुकसान झाले होते.