रस्ते दुरुस्तीची कामे कुचकामी करणाऱ्या बिटकॉनला १० लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2021 10:12 PM2021-10-07T22:12:21+5:302021-10-07T22:12:32+5:30
ठाणे महापालिका हद्दीत रस्त्यांवर पडलेल्या खडय़ांच्या मुद्यावरुन पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेवर टिकेची झोड उठविण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : रस्ते दुरुस्तीच्या कामात ढिलाई करणा:या चार कार्यकारी अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असतांनाच आता ठाणो महापालिकेने शहरातील रस्ते दुरु स्तीची कामे करणा:या मे. बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि या ठेकेदारास पावसाळ्यात रस्ता वाहतूक योग्य न राखल्यामुळे तसेच गुणवत्तापूर्ण काम न केल्याप्रकरणी १० लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी दिली आहे.
ठाणे महापालिका हद्दीत रस्त्यांवर पडलेल्या खडय़ांच्या मुद्यावरुन पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेवर टिकेची झोड उठविण्यात आली होती. त्यानंतर ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील रस्त्यांची पाहणी करुन रस्त्यांची कामे निकृष्ठ करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर त्यांनी दोषी असलेल्या अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते. त्यानंतर पालिका आयुक्तांनी महापालिकेच्या चार कार्यकारी अभियंत्यांना निलंबित केले होते. तसेच ठेकेदाराकडून करण्यात आलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची चौकशी देखील लावण्यात आली होती. त्या अनुषंगाने निविदाकारांना तातडीने कामे करणोबाबत व त्यांचे विरु ध्द कारवाई करणोबाबत बांधकाम विभागाकडून नोटीस बजावण्यात आली होती. परंतु दिलेल्या वेळेत गुणवत्तापूर्ण न केल्याने संबंधित ठेकेदारास तब्बल १० लाख रु पयांचा दंड महापालिका प्रशासनाने ठोठावला आहे.
संबंधित ठेकेदारास कार्यादेशात दिलेल्या भागात पावसाळ्यात रस्त्यातील खड्डे भरु न व तात्पुरती दुरु स्ती करु न रस्ता वाहतुकीयोग्य ठेवणो ही संबंधित ठेकेदाराची जबाबदारी आहे. संबंधित कार्यकारी अभियंता यांनी वेळोवेळी सुचना देवूनही काम न केल्याने मोठ्या प्रमाणावर खड्डे दिसून आले आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होत असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. तसेच या रस्त्यावर केलेले काम काही ठिकाणी काही दिवसातच नादुरु स्त झाले आहे.
ठाणो महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिलेल्या सुचनेनुसार ठराविक वेळेत, काम पुर्ण केले नसल्याने निविदेतील अटी व शर्तीनुसार दंडात्मक कारवाई करणोबाबत ३ दिवसात खुलासा करण्याचे आदेश संबंधित ठेकेदारास देण्यात आले होते. तसेच या कामासोबतच ३ दिवसाच्या कालावधीत कार्यालयाने दिलेल्या सुचनेनुसार नौपाडा कोपरी, उथळसर व वर्तकनगर प्रभाग समितीमधील देखील खड्डे दुरु स्तीचे काम योग्य गुणवत्ता राखुन काम पुर्ण करून रस्ता वाहतुकीस योग्य करण्याचे आदेशही देण्यात आले होते. परंतु पावसाळ्यात रस्ता वाहतूक योग्य न राखल्यामुळे तसेच दिलेल्या वेळेत गुणवत्तापूर्ण काम न केल्यामुळे मे.बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि या ठेकेदारास १० लाख रु पयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे.