पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला अडीच वर्षाच्या मुलीच्या नाकाचा चावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 06:57 PM2018-09-27T18:57:29+5:302018-09-27T19:46:52+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-5, प्रेमनगर टेकडी परिसरात किरण बागल कुटुंबासह राहतात. काल सकाळच्यादरम्यान अडीज वर्षाची मुलगी प्रांजली घरासमोरील दुकानासमोर खेळत होती.
उल्हासनगर - घरासमोर खेळत असलेल्या अडीच वर्षाच्या मुलीच्या नाकाचा चावा पिसाळलेल्या कुत्र्याने घेतल्याने मुलगी गंभीर जखमी झाली आहे. मुलीवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु असून पिसाळलेल्या कुत्र्याला पालिका पथकाने पकडले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-5, प्रेमनगर टेकडी परिसरात किरण बागल कुटुंबासह राहतात. काल सकाळच्यादरम्यान अडीज वर्षाची मुलगी प्रांजली घरासमोरील दुकानासमोर खेळत होती. त्यावेळी पिसाळलेल्या कुत्र्याने प्रांजलीच्या नाकाचा चावा घेउन तिला ओढून नेण्याचा प्रयत्न करीत होता. एका महिलेने परिस्थिती ओळखून कुत्र्याला हुसकावून लावून मुलीची सुटका केली. कुत्र्याच्या चाव्यात मुलीचे नाक व कान फाटले असून जखमीं झालेल्या प्रांजलीवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहे.स्थानिक नागरिकांनी महापालिका आरोग्य विभागाला पिसाळलेल्या कुत्र्याची माहीती दिल्यानंतर पालिका आरोग्य पथकाने कुत्र्याला पकडले आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने 5 ते 6 जणांचा चावा घेतल्याचे उघड झाले. यापूर्वीही याच परिसरात मुलाला चावा घेतल्याची घटना घडली होती. महापालिकेने नुकताच तब्बल 2 हजार कुत्र्याच्या नसबंदीचे कंत्राट दिले आहे, अशी माहिती पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ राजा रिजवानी यांनी दिली आहे.