उल्हासनगरात शाळकरी मुलीचा विनयभंग प्रकरणी भाजप आक्रमक, शाळा व्यवस्थापनावर कारवाईची मागणी
By सदानंद नाईक | Published: September 14, 2024 06:06 PM2024-09-14T18:06:11+5:302024-09-14T18:06:30+5:30
हिललाईन पोलीसानी याप्रकरणी विनयभंग व पोक्सॉ अंतर्गत गुन्हा दाखल करून शिक्षकाला गजाआड केले.
सदानंद नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर : शाळकरी ७ वर्षाच्या मुलीच्या विनयभंग प्रकरणी भाजपने पत्रकार परिषद घेऊन शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार कुमार आयलानी यांनी केली. हिललाईन पोलीसानी याप्रकरणी विनयभंग व पोक्सॉ अंतर्गत गुन्हा दाखल करून शिक्षकाला गजाआड केले.
उल्हासनगर पूर्वेतील एका शाळेत इयत्ता पहिली कक्षात शिकणाऱ्या ७ वर्षाच्या मुलीचा पिटी शिक्षकाकडून विनयभंग झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी उघड झाली. याप्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून हिललाईन पोलीस ठाण्यात शिक्षकावर विनयभंग व पोक्सॉ अंतर्गत गुन्हा दाखल करून शिक्षकाला गजाआड केले. बदलापूर घटने प्रमाणे पोलिसांनी शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपने पत्रकार परिषद घेऊन शुक्रवारी केली. शाळा व्यवस्थापनावर कलानी कुटुंबातील व्यक्तीचा समावेश असल्याने, त्यांना भाजपने पत्रकार परिषद घेऊन टार्गेट केल्याचे बोलले जात आहे. शाळेतील घटना गणेशोत्सवपूर्वी झाली असून सुट्टीत पालकांनी मुलीला बोलते केल्यावर घटना उघड झाली आहे.
भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, आमदार कुमार आयलानी, जमनुदास पुरस्वानी, राजेश वधारिया, सिंधू शर्मा आदीजन पत्रकार परिषदेला उपस्थित होते. भाजप शिष्टमंडळाने हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी भेट घेऊन शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच याप्रकरणी पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांची सोमवारी भेट घेऊन मुलीच्या विनयभंग प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे आमदार कुमार आयलानी यांनी यावेळी सांगितले. तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार आंदोलन करण्याचा इशारा शहरजिल्हाध्यक्ष रामचंदानी यांनी यावेळी दिला आहे. याप्रकरणी कलानी कुटुंबाशी संपर्क केला असता झाला नाही.
कलानी कुटुंब भाजपच्या टार्गेटवर?
बदलापूर घटने प्रमाणे हिललाईन पोलिसांनी शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपने केली. शाळा व्यवस्थापनावर कलानी कुटुंबातील सदस्य असून याप्रकरणी कलानी यांना भाजपने टार्गेट केल्याचे बोलले जात आहे.