शाहजहॉ शेखला पाठीशी घालणाऱ्या ममता बॅनर्जींचा भाजपाकडून निषेध
By अजित मांडके | Published: March 1, 2024 02:28 PM2024-03-01T14:28:45+5:302024-03-01T14:28:58+5:30
पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील महिलांचा लैंगिक छळ व जमीन बळकावणारा तृणमूल कॉंग्रेसचा पदाधिकारी शाहजहॉं शेखला पाठीशी घालणाऱ्या पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाजपा महिला मोर्चाकडून तीव्र निषेध करण्यात आला.
ठाणे : पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील महिलांचा लैंगिक छळ व जमीन बळकावणारा तृणमूल कॉंग्रेसचा पदाधिकारी शाहजहॉं शेखला पाठीशी घालणाऱ्या पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाजपा महिला मोर्चाकडून तीव्र निषेध करण्यात आला. ठाणे रेल्वे स्टेशनबाहेरील सॅटीस पुलाखाली केलेल्या आंदोलनात ममता बॅनर्जींचा धिक्कार करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
तृणमूल कॉंग्रेसचा नेता शाहजहॉं शेख याने संदेशखालीमधील अनेक महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या महिलांच्या तक्रारीनंतरही तृणमूल कॉंग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अटकेची कारवाई केलेली नाही. याप्रकरणी भाजपाने तीव्र आंदोलन केल्यानंतर अखेर ५५ दिवसांनंतर आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी शाहजहॉं शेख याला फाशी देण्याच्या मागणीसाठी ठाणे शहर भाजपा व महिला मोर्चाच्या वतीने सॅटीस पुलाखाली आज आंदोलन करण्यात आले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. या वेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या.
या आंदोलनात माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, माजी नगरसेविका नम्रता कोळी, महिला मोर्चाच्या सरचिटणीस रितू सिकॉन, प्रिती मॅनिया, महिला मोर्चाच्या कोपरी मंडल अध्यक्षा सुवर्णा अवसरे, नौपाडा मंडल अध्यक्षा वृषाली वाघुले-भोसले, ओबीसी महिला मोर्चाच्या अध्यक्षा मत्स्यगंधा पवार, श्रुतिका मोरेकर, अनुराधा रोडे, अश्विनी दुबे, राधा मटकर, करुणा गौड, जिल्हा सरचिटणीस मनोहर सुगदरे, सचिन पाटील, विलास साठे, उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, डॉ. राजेश मढवी, सागर भदे, विक्रम भोईर, राजेश गाडे, अमरीश ठाणेकर, दया यादव, दिलीप कंकाळ, सुदर्शन साळवी, हेमंत म्हात्रे, नौपाडा मंडल अध्यक्ष विकास घांग्रेकर, कोपरी मंडल अध्यक्ष शिवाजी रासकर, युवा मोर्चाचे सरचिटणीस प्रशांत कळंबटे, रामकिशन जयस्वाल, विशाल वाघ, राकेश जैन, योगेश भुजबळ, रोहित गोसावी, हिमांशू राजपूत, सन्मान कोळी, रोहित तिवारी, अरुण कोणार, अंकित हजारे, छंद नायक, अनिल चिंडलीया, राहुल कुंड आदी सहभागी झाले होते.