मीरा भाईंदर महापालिकेच्या महासभेत भाजपा-काँग्रेसमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 07:49 PM2022-08-03T19:49:17+5:302022-08-03T19:49:55+5:30

मीरा भाईंदर महापालिकेच्या बुधवारच्या महासभेत महिला बाल कल्याण समिती मधील विविध योजनांतील गैरप्रकारांवरून काँग्रेस नगरसेवक सभागृहात आरोप करत असताना दुसरीकडे प्रेक्षक गॅलरीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी अंगावर महापौर - आयुक्त लक्ष द्या व भ्रष्टाचाराच्या आरोपांचे बॅनर झळकावले.

BJP Congress clashed in Meera Bhayander Municipal Corporation General Assembly | मीरा भाईंदर महापालिकेच्या महासभेत भाजपा-काँग्रेसमध्ये जुंपली

मीरा भाईंदर महापालिकेच्या महासभेत भाजपा-काँग्रेसमध्ये जुंपली

Next

मीरारोड - 

मीरा भाईंदर महापालिकेच्या बुधवारच्या महासभेत महिला बाल कल्याण समिती मधील विविध योजनांतील गैरप्रकारांवरून काँग्रेस नगरसेवक सभागृहात आरोप करत असताना दुसरीकडे प्रेक्षक गॅलरीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी अंगावर महापौर - आयुक्त लक्ष द्या व भ्रष्टाचाराच्या आरोपांचे बॅनर झळकावले. त्यावरून भाजपा व काँग्रेस मध्ये चांगलीच जुंपली. कार्यकर्त्यांच्या अंगावरील बॅनर सुरक्षा रक्षकांनी काढून घेताना तणावाचे वातावरण झाले. 

महासभेत महिला बालकल्याण समिती मधील विविध योजनांच्या लाभार्थीना अटीशर्ती ठरवण्याच्या धोरणास मंजुरीचा प्रस्ताव आला होता. तर काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत, जुबेर इनामदार, मर्लिन डिसा आदींनी समितीच्या योजनां मधील बोगस व अपात्र लाभार्थी, होत असलेले गैरप्रकार आदींचे मुद्दे उपस्थित करून प्रशासना सह सत्ताधारी यांची अडचण केली. 

सभागृहात भाजपा व काँग्रेस अशी जुंपली असतानाच प्रेक्षक गॅलरीत असलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, महिला जिल्हाध्यक्ष रूपा पिंटो, कार्याध्यक्ष फरीद कुरेशी, सह यास्मिन खान,  युवक काँग्रेस दीप काकडे, सिद्धेश राणे, कुणाल काटकर,  अनवर खान, दीपक बागरी, सेल अध्यक्ष मुकुल त्यागी आदींनी अंगावर फलक घालून उभे राहिले. 

घरघंटी वाटप, शालेय बॅग वाटप, बोगस लाभार्थी दाखवून उकळलेले पैसे अशा विविध प्रकरणात १८ कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा मांडत महापौर ज्योत्सना हसनाळे व आयुक्त दिलीप ढोले नागरिकांना हिशोब द्या अश्या आशयाचे फलक पाहून सभागृहात भाजपाच्या नगरसेवकांनी तीव्र हरकत घेतली. काँग्रेस आंदोलनाचा विरोध करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. 

महापौरांनी फलक काढू कार्यकर्त्यांना बाहेर काढा व गुन्हा दाखल करा असा आदेश दिल्यावर सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांनी  घातलेले फलक काढून घेतले. फलक काढते वेळी गोंधळ झाला. काँग्रेसच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना महापौरांनीच काँग्रेस वर भ्रष्टाचार केल्याचा आणि ३ लाख घेतल्याचा आरोप केला. त्यामुळे भाजपा आणि काँग्रेस मध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसले. सभागृहात देखील काँग्रेसने ठराव मांडताना महिला बाल कल्याण समिती मधील गैरप्रकारांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

Web Title: BJP Congress clashed in Meera Bhayander Municipal Corporation General Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.