नगरसेविका सोन्स यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 03:10 AM2020-08-14T03:10:27+5:302020-08-14T03:10:43+5:30
मुंबई उपनगर जिल्हा जातपडताळणी समितीने १० ऑगस्ट रोजी दिलेल्या निकालात सोन्स यांना दिलेले जात प्रमाणपत्र रद्द ठरवले.
मीरा रोड : मीरा-भाईंदर पालिकेतील भाजप नगरसेविका नीला सोन्स यांना दिलेले जातवैधता प्रमाणपत्र हे सहा महिन्यांत जातपडताळणी समितीनेच रद्द केले आहे. बनावट कागदपत्रे सादर केल्याने गुन्हा दाखल करण्याचे आदेश समितीने दिले आहे.
मुंबई उपनगर जिल्हा जातपडताळणी समितीने १० ऑगस्ट रोजी दिलेल्या निकालात सोन्स यांना दिलेले जात प्रमाणपत्र रद्द ठरवले. मुंबई उपनगर उपजिल्हाधिकाऱ्यांकडून ३ फेब्रुवारी रोजी अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र दिले होते. त्यानंतर, मुंबई उपनगरे जिल्हा जातपडताळणी समितीने १४ दिवसांत सोन्स यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवत १७ फेब्रुवारी रोजी जातवैधता प्रमाणपत्र दिले होते.
या प्रमाणपत्राविरोधात आमदार चव्हाण, मेहता आदींनी समितीकडे मार्चमध्ये तक्र ारी केल्या होत्या. जात प्रमाणपत्रासाठी सोन्स यांनी त्या स्वत: ठाण्याच्या रा.ज. ठाकूर कनिष्ठ महाविद्यालय येथे सहशिक्षिका म्हणून काम करत असून पदोन्नतीसाठी जातीचा दाखला मिळावा म्हणून शाळेचे शिफारसपत्र जोडले होते.
तक्रारीनंतर समितीच्या दक्षता पथकाच्या चौकशीत सोन्स त्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करत नसल्याचे व शिफारसपत्र बनावट असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सोन्स यांनी सांगितले.