भाजपा नगरसेवक प्रशांत केळुसकर फरार

By admin | Published: August 21, 2016 01:37 AM2016-08-21T01:37:17+5:302016-08-21T01:37:17+5:30

भार्इंदर पूर्वेला एका सदनिकेत चालणाऱ्या जुगाराच्या अड्ड्यावर उत्तन पोलिसांनी छापा टाकून सदनिकामालकासह १२ जुगाऱ्यांना अटक केली आहे. त्यावेळी जुगार खेळणारा भाजपा

BJP corporator Prashant Keluskar absconding | भाजपा नगरसेवक प्रशांत केळुसकर फरार

भाजपा नगरसेवक प्रशांत केळुसकर फरार

Next

मीरा रोड : भार्इंदर पूर्वेला एका सदनिकेत चालणाऱ्या जुगाराच्या अड्ड्यावर उत्तन पोलिसांनी छापा टाकून सदनिकामालकासह १२ जुगाऱ्यांना अटक केली आहे. त्यावेळी जुगार खेळणारा भाजपा आमदारांचा निकटवर्तीय नगरसेवक प्रशांत नारायण केळुस्कर मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रलोक फेज-६ च्या मयूरा पॅलेस इमारतीमध्ये १०१ क्रमांकाच्या सदनिकेत जुगार खेळला जात असल्याच्या तक्रारी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्यापर्यंत गेल्या होत्या. पाटील यांनी उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी सरोजना मोकलीकर यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने मोकलीकर यांच्यासह अशोक पालवे, युवराज पाटील, अहिरे, निलंगे या पोलीस कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास सदनिकेवर धाड टाकली. पोलिसांची धाड पडताच जुगार खेळणाऱ्यांची भंबेरी उडाली.
पोलिसांच्या भीतीने जुगार खेळणारा भाजपाचा भार्इंदर पूर्वेतील नगरसेवक आणि माजी स्थायी समिती सभापती प्रशांत केळुस्कर हा पळून गेला. केळुस्कर हा आमदार नरेंद्र मेहतांचा विश्वासू म्हणून ओळखला जातो. तर, पोलिसांनी सदनिकेचा मालक रितेश नारायण चौरसियासह चारुदत्त आयतोडा, चिराग मेहता, जिग्नेश चोपडा, नीरज ओथिवाल, जयंत सिंह, जयेश गोयल, मोहम्मद हुसेन, युनुस नडाफ, मोहम्मद इस्लाम, दाराब सिद्दीकी, समीर शेख या १२ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पत्ते व २८ हजार रोख जप्त केले आहेत. नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

शाळेतील गटारीनंतर आता जुगारी
जुगार खेळणारा भाजपा नगरसेवक प्रशांत केळुस्कर याच्याविरोधात पोलिसांनीच फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला असला, तरी तो पळून गेला आहे. काही दिवसांपूर्वीच माशाचा पाडा महापालिका शाळेच्या आवारात गटारीची पार्टी केल्याप्रकरणी भाजपा नगरसेवक अनिल भोसले याच्याविरुद्ध काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भोसलेला तर भाजपाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. भोसलेपाठोपाठ आता जुगारावरून केळुस्करदेखील अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Web Title: BJP corporator Prashant Keluskar absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.