भाजपा नगरसेवक विलास कांबळे यांचा हॉटेलमध्ये झाला मृत्यु
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 03:21 PM2020-05-29T15:21:26+5:302020-05-29T15:24:05+5:30
शवविच्छेदन केले जाणार असून त्यानंतर त्यांच्या मृत्युचे कारण स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली.
ठाणे - भाजपचे नगरसेवक विलास कांबळे यांचा दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. परंतु त्यांचा मृत्यु कशामुळे झाला याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. ते येथील एका हॉटेलमध्ये काही दिवसांपासून वास्तव्यास होते. तेथेच त्यांचा रुममध्ये मृत्यु झाल्याची माहिती सुत्रंनी दिली. त्यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे. पोर्समॉर्टन केले जाणार असून त्यानंतर त्यांच्या मृत्युचे कारण स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली. परंतु त्यांचा मृत्यु हृदय विकाराच्या धक्याने झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.
मागील काही दिवसापासून विलास कांबळे हे ठाण्यातील नौपाडा भागातील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. गुरुवारी रात्री त्यांनी आपल्या घरी फोन करुन आई आणि पत्नीशी संवाद साधला होता. तसेच आपल्याला पोटाचा त्रस होत असल्याचेही त्यांनी सांगितले होते. दरम्यान त्यानुसार शुक्रवारी सकाळी घरच्यांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांच्या घरातील काही मंडळींनी हॉटेलकडे धाव घेतली. ते ज्या रुममध्ये वास्तव्यास होते, त्या रुमचा दरवाजा उघडला तेव्हा, बेडवर विष्टा पडलेले होते, आणि ते खाली पडले होते, अशी माहिती त्यांच्या निकतवर्टियानी दिली. त्यानंतर त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तो र्पयत त्यांचा मृत्यु झाला होता. अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. या प्रकरणी पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली असून, त्यांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. परंतु त्यांचा मृत्यु हा हृदय विकाराच्या धक्याने झाला असावा अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परीवार आहे.
विलास कांबळे हे वागळे इस्टेट पटयातील भाजपचे नगरसेवक होते. ते सलग दोन टर्म महापालिकेवर निवडून गेले होते. विशेष म्हणजे त्यांनी मागील टर्ममध्ये सात महिने स्थायी समितीचे सभापतीपदही भुषविले होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, आमि 2017 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत ते आणि त्यांची पत्नी हे दोघेही निवडून आले होते. दरम्यान आता त्यांची कोरोना चाचणीही केली गेली असल्याची माहिती रुग्णालयाच्या सुत्रंनी दिली. त्यामुळे मृत्युचे नेमके कारण काय आहे, हे आता शवविच्छेदन अहवालानंतर आणि कोरोनाचा रिपोर्ट आल्यानंतच स्पष्ट होईल अशी माहिती पोलिस सुत्रंनी दिली.
ठाणे - भाजपा नगरसेवक विलास कांबळे यांचा हॉटेलमध्ये झाला मृत्यू https://www.lokmat.comhttps://www.lokmat.com/
— Lokmat (@MiLOKMAT) May 29, 2020
Lockdown: पालकांनो, आपल्या मुलांकडे लक्ष द्या; लॉकडाऊनमुळे १२ वर्षाच्या मुलाची आत्महत्या, कारण...