तक्रार देण्यासाठी गेलेल्या भाजप नगरसेवकाची पाेलिसांकडून लॉकअपमध्ये रवानगी, संतप्त आमदाराचा ठाण्यात गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 04:25 PM2020-08-15T16:25:39+5:302020-08-15T16:27:18+5:30
नगरसेवक राय हे व्यवयासाने बिल्डर आहेत. एका जागेवरुन त्याचा वाद काही लोकांशी वाद सुरु आहे. या वादाचे रुपांतर काल दुपारी हाणामारीत झाले होते.
कल्याण-कल्याण पूर्वेतील भाजप नगरसेवक मनोज राय हे त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गेले असता पोलिसांनी राय यांनाच लॉकअपमध्ये टाकले. हा प्रकार कळताच त्याठिकाणी भाजप आमदार गणपत गायकवाड हे जाब विचारण्यासाठी गेले आणि त्यांनी वरिष्ठ पोलिस निरिक्षक शाहूराज साळवे यांना चांगलेच फैलावर घेतले. आमदारांनी पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याने पोलिसांनी त्यांच्या विरोधातही कोविडचा गुन्हा दाखल केला आहे.
नगरसेवक राय हे व्यवयासाने बिल्डर आहेत. एका जागेवरुन त्याचा वाद काही लोकांशी वाद सुरु आहे. या वादाचे रुपांतर काल दुपारी हाणामारीत झाले. राय हे आपल्या मुले कार्यकत्र्यासोबत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल नसताना व त्यांची तक्रार न घेताच थेट त्यांच्या दोन मुलांसह लॉकअपमध्ये टाकले. हा प्रकार कळताच भाजप आमदार गायकवाड हे पोलिस ठाण्यात पोचले. त्यांनी पूर्ण पोलिस ठाणो डोक्यावर घेतले. वरिष्ठ पोलिस निरिक्षक शाहूराज साळवे यांना चांगलेच सुनावले. त्यावेळी साळवे यांनी मौन धारण करीत ‘हो ला हो’ उत्तर दिले. आमदार राग काही शांत नव्हता. आमदार त्यानंतर पोलिस ठाण्यातून निघून गेले. या प्रकरणी मनोज राय आणि त्यांच्या विरोधकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राय यांच्या विरोधात गजानन म्हात्रे यांच्यासह त्यांच्या साथीदाराना मारहाण केल्याच्/ी आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. तर राय यांच्या तक्रारीवरुन गजानन म्हात्रेसह अन्य जणांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात येऊन गर्दी जमविली. तसेच मास्कही घातला नव्हता. कोविड काळात गर्दी जमविल्या प्रकरणी पोलिसांनी आमदार गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात आमदार गायकवाड यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मी एकटाच त्याठिकाणी जाब विचारण्यासाठी गेलो होतो. एखाद्या प्रकरणी जाब विचारणो चुकीचे असेल तर माङया विरोधात जो गुन्हा दाखल झाला आहे. त्याविरोधात न्यायालयात दाद मागणार. ज्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. ते पोलिस ठाण्यात बसतात. तक्रार करणा:या लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल करुन त्यांनाच लॉकअपमध्ये टाकले जाते. हा कुठला न्याय असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शाहूराज साळवे यांनी सांगितले की, राय व त्यांच्या विरोधात जमीनीच्या वादातून हाणामारी झाली. त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. हे कायद्याचे राज्य आहे. त्यामुळे चुकीचे आरोप करणा:या आमदारांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल.