परदेशी नागरिकांना गंडा घालणाऱ्या भाजपा नगरसेवकाच्या मुलाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 08:12 PM2018-08-20T20:12:07+5:302018-08-20T20:12:38+5:30

परदेशी नागरीकांच्या क्रेडिट कार्ड व गिफ्ट कार्ड आदीची माहिती चोरत त्या रकमेतुन बीटकॉईन खरेदी करत मग भारतिय चलनात वळवुन फसवणूक करणा-या करणा-या ऋषी मदन सिंग (२६) या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

 BJP corporator's son arrested for cheating with foreign nationals | परदेशी नागरिकांना गंडा घालणाऱ्या भाजपा नगरसेवकाच्या मुलाला अटक

परदेशी नागरिकांना गंडा घालणाऱ्या भाजपा नगरसेवकाच्या मुलाला अटक

Next

 मीरारोड - परदेशी नागरीकांच्या क्रेडिट कार्ड व गिफ्ट कार्ड आदीची माहिती चोरत त्या रकमेतुन बीटकॉईन खरेदी करत मग भारतिय चलनात वळवुन फसवणूक करणा-या करणा-या ऋषी मदन सिंग (२६) या तरुणाला पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्या दिल्लीतील साथदारांचा शोध सुरु असून, अटक आरोपी हा भाजपा नगरसेवक मदन सिंग यांचा मुलगा आहे. या टोळीने लाखोरुपयांचा घोटाळा केल्याची शक्यता असुन पोलीस तपास करत आहेत.

सहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना माहिती मिळाली की परदेशी नागगरीकांच्या क्रडिट कार्ड, गिफ्टकार्ड आदीचा डेटा चोरुन त्या आधारे मोठ्या प्रमाणात पैशांची फसवणुक केली जात आहे. पोलीसांना खात्री पटताच त्यांनी भार्इंदरच्या जेसल पार्क मध्ये राहणारे भाजपा नगरसेवक तथा प्रभाग समिती सभापती मदन सिंग यांच्या घरावर धाड टाकुन त्यांचा मुलगा ऋषी याला ताब्यात घेतले.

पोलीसांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता त्यात व्हॅट्सएप व ईमेल मध्ये परदेशी नागरीकांची क्रेडिटकार्डची माहिती, गिफ्ट कार्ड तसेच छायाछित्र मिळून आली. सदर परदेशी नागरीकांचा हा डेटा आपल्या दिल्ली वरुन पाठवण्यात आल्याचे आरोपीने पोलीसां कडे कबुल केले.

या डेटा द्वारे गिफ्ट कार्डचा झीपकोड वापरुन इंटरनेटवरील संकेतस्थळाच्या माध्यमातुन त्याचे मुल्य बीटकॉईन खरेदी केले. त्या नंतर त्या बीटकॉईनचे भारतिय चलनात रुपांतर करुन घेतले. ते पैसे ऋषी हा साथीदारांच्या खात्यावर वळवत असे. यात त्याला कमीशन मिळत होते.

आरोपींनी चोरलेला डेटा हा अमेरीकन नागरीकांचा असुन २०१५ पासुन या टोळीने आता पर्यंत लाखो रुपयांना गंडा घातल्याची शक्यता आहे. या प्रकरणी पोलीसांनी आरोपीचे बँक पासबुक आदी ताब्यात घेतले असुन त्यात देखील पैशांचे व्यव्हार झाल्याचे समोर आले आहे. आरोपी ऋषी हा दिल्लीला गेल्या वर्षी गेला होता .

गुन्ह्याची व्याप्ती मोठी असुन या प्रकरणी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शना खाली निरीक्षक सुरेश गेंगजे तपास करत आहेत. एकुण किती परदेशी नागरीकांना किती रकमेला गंडवले आहे याची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. या फसवणुकीत भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक असलेले मदन सिंग यांचा मुलगा आरोपी असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
 

Web Title:  BJP corporator's son arrested for cheating with foreign nationals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.