भाजपा जिल्हाध्यक्ष एड व्यास यांची मीरा भाईंदर विधानसभा निवडणूक प्रमुख पदी नियुक्ती
By धीरज परब | Updated: June 11, 2023 16:54 IST2023-06-11T16:53:24+5:302023-06-11T16:54:00+5:30
भाजपाचा विक्रमी विजय निश्चित असल्याची ग्वाही एड. व्यास यांनी कार्यकर्त्यां सोबत बोलताना दिली आहे.

भाजपा जिल्हाध्यक्ष एड व्यास यांची मीरा भाईंदर विधानसभा निवडणूक प्रमुख पदी नियुक्ती
मीरारोड - मीरा भाईंदर भाजपाचे जिल्हाध्यक्ष एड. रवी व्यास यांची मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुख पदी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष यांनी केलेल्या व्यास यांच्या नियुक्ती चे आमदार गीता जैन, माजी महापौर ज्योत्स्ना हसनाळे, भाजपाचे ठाणे जिल्हा पदाधिकारी हेमंत म्हात्रें सह ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील, माजी उपमहापौर चंद्रकांत वैती सह अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.
व्यास यांनी नियुक्ती बद्दल आभार मानत भाजपाचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सरचिटणीस श्रीकांत भारतीय, प्रभारी जयप्रकाश ठाकूर आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आणि विधानसभा मतदारसंघात भाजपाचा विक्रमी विजय निश्चित असल्याची ग्वाही एड. व्यास यांनी कार्यकर्त्यां सोबत बोलताना दिली आहे.