भाजपा मित्रांना धोका देत नाही, आता खरी शिवसेना आमच्या सोबत; देवेंद्र फडणवीसांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 01:52 PM2022-08-10T13:52:45+5:302022-08-10T18:54:28+5:30
भाजपचे सुशील मोदी ह्यांनी केलेल्या व्यक्तव्य बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, बिहारमध्ये आमचे ७५ निवडून आले आणि जेडीयुचे ४२ निवडून आले, तरी आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भारतीय जनता पार्टी हि कधीही मित्र पक्षांना धोका देत नाही. महाराष्ट्रातही शिवसेनेने त्यावेळी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, म्हणून आता खरी शिवसेना आमच्या सोबत आली असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते ठाण्यात 'लोकमत'च्या कार्यालयाच्या उदघाटनावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भाजपचे सुशील मोदी ह्यांनी केलेल्या व्यक्तव्य बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, बिहारमध्ये आमचे ७५ निवडून आले आणि जेडीयुचे ४२ निवडून आले, तरी आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले, त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा कधीही मित्र पक्षांना धोका देत नाही, आज सरकार गेले आहे पण पुन्हा येईल, असे मत देखील फडणवीस यांनी व्त्यायक्तत केले. तसेच महाराष्ट्रात देखील शिवसेनेन त्यावेळी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, म्हणून आता खरी शिवसेना आमच्या सोबत आली असल्याचे स्पष्ट केले. तसेच कॉंग्रेस सोडले तेव्हा पक्ष आणि चिन्ह देखील बदले, शिवसेनेच्या चिन्हावरून वाद का त्यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता, त्यावेळी डिफेकशनाचे कायदे त्यावेळी नव्हते.
आज ते कायदे अस्तित्वात आहे. त्यामुळे कायदेशीर करावी लागत असून ती लढाई शिंदे कर असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आमचा मित्र पक्ष आहे शिवसेना त्यांचे पन्नास लोक आहेत, आमच्याचे ११५ लोक आहेत, त्यांना आम्ही मुख्यमंत्री पद दिले आहे, काल त्यांचे नऊ आणि आमचे नऊ असे मंत्रिमंडळ शपथविधी झाले आहे, मला असे वाटते पवार साहेब यांचे दुखणे वेगळे आहेत, आणि ते आपल्या सगळ्यांना माहीत असल्याच देखील फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.