मीरा-भार्इंदर पालिकेच्या तिन्ही समितींत भाजपाचेच वर्चस्व; सदस्यांची नावे जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 08:01 PM2017-10-16T20:01:53+5:302017-10-16T20:02:40+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेची विशेष महासभा सोमवारी पार पडली. तीच्या सुरुवातीलाच नवीन स्थायी समितीसह महिला व बाल कल्याण समिती तसेच वृक्षप्राधिकरण व उद्यान समितीतील सदस्यांच्या नावांची घोषणा
भार्इंदर: मीरा-भार्इंदर महापालिकेची विशेष महासभा सोमवारी पार पडली. तीच्या सुरुवातीलाच नवीन स्थायी समितीसह महिला व बाल कल्याण समिती तसेच वृक्षप्राधिकरण व उद्यान समितीतील सदस्यांच्या नावांची घोषणा महापौर डिंपल मेहता यांनी केली. पालिकेत यंदा भाजपाची एकहाती सत्ता असल्याने सर्व समित्यांवर भाजपाचेच वर्चस्व असल्याने सेना, काँग्रेसला केवळ विरोधकांचीच भूमिका पार पाडावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आॅगस्टमध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक ६१ जागा, सेनाला २२ तर काँग्रेसला १० जागा व काँग्रेस पुरस्कृत अपक्षांना दोन जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसने कोकण विभागीय आयुक्तांकडे दिलेल्या तौलनिक सदस्य संख्या बळानुसार अपक्ष व काँग्रेसची काँग्रेस लोकशाही आघाडी स्थापन करण्यात आली आहे. या सर्व समित्यांत बहुमतामुळे भाजपाचे वर्चस्व असुन सेना, काँग्रेस मात्र विरोधापुरती राहणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. एकुण ९५ जागांनुसार स्थायीतील एकुण सदस्य संख्या १६ तर महिला व बाल कल्याण आणि वृक्षप्राधिकरण व उद्यान समितीतील सदस्यसंख्या प्रत्येकी १५ इतकी आहे. याप्रमाणात भाजपाच्या वाट्याला सर्व समित्यांत प्रत्येकी १० जागा आल्या असुन सेनेला स्थायीत ४ व उर्वरीत दोन समित्यांत प्रत्येकी ३ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला स्थायीसह उर्वरीत दोन समित्यांत प्रत्येकी २ जागा प्राप्त झाल्या आहेत. या समित्यांत नवीन सदस्यांची नावे सोमवारच्या विशेष महासभेत महापौरांकडुन जाहिर करण्यात आली. त्यात स्थायीसाठी भाजपाकडुन गटनेते हसमुख गेहलोत, ध्रुवकिशोर पाटील, अॅड. रवि व्यास, मीरादेवी यादव, अशोक तिवारी, प्रशांत दळवी, मेघना रावल, सुरेश खंडेलवाल, अनिल विराणी व मोहन म्हात्रे, सेनेकडुन तारा घरत, अनिता पाटील, दिप्ती भट व वंदना विकास पाटील तर काँग्रेस लोकशाही आघाडीकडुन जुबेर इनामदार व नुरजहाँ नझर हुसेन यांची नावे जाहिर करण्यात आली. महिला व बाल कल्याण समितीसाठी भाजपाकडुन शानू गोहिल, ज्योत्स्रा हसनाळे, वंदना भावसार, सुनिता भोईर, सीमा शाह, सुरेखा सोनार, नयना म्हात्रे, वैशाली रकवी, दिपिका अरोरा व रक्षा भुप्तानी, सेनेकडुन अर्चना कदम, कुसुम गुप्ता व हेलन गोविंद जॉर्जी तर काँग्रेस लोकशाही आघाडीकडुन रुबीना शेख व सारा एहमद यांची नावे जाहिर करण्यात आली. वृक्षप्राधिकरण व उद्यान समितीसाठी भाजपाकडुन विनोद म्हात्रे, गणेश शेट्टी, सचिन म्हात्रे, प्रिती पाटील, नीला सोन्स, मीना कांगणे, मनोज दुबे, गणेश भोईर, सुजाता पारधी व हेमा बेलानी, सेनेकडुन आनंद शिर्के, एलायस बांड्या व कमलेश भोईर तर काँग्रेस लोकशाही आघाडीकडुन राजीव मेहरा व अमजद शेख यांची नावे जाहिर करण्यात आली. महासभेच्या सुरुवातीला भाजपा आ. नरेंद्र मेहता यांच्या पत्नी सुमन यांनी पत्रकार कक्षात हजेरी लावुन राजकीय डावपेच शिकण्यास सुरुवात केल्याचे पक्षाच्या सुत्राकडुन सांगण्यात आले. यावरुन आगामी राजकारणात त्यांचे पदार्पण होणार असल्याचे संकेत मिळु लागले आहेत.