श्रमदान करून भाजपने बुजविले खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:44 AM2021-08-19T04:44:15+5:302021-08-19T04:44:15+5:30

ठाणे : रस्त्यांवरील खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे; त्यामुळे याविरोधात बुधवारी भाजपने तीनहात नाका येथे आंदोलन केले. यावेळी ...

BJP filled the pits with labor | श्रमदान करून भाजपने बुजविले खड्डे

श्रमदान करून भाजपने बुजविले खड्डे

Next

ठाणे : रस्त्यांवरील खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे; त्यामुळे याविरोधात बुधवारी भाजपने तीनहात नाका येथे आंदोलन केले. यावेळी श्रमदान करून या भागातील खड्डे बुजविले. ठाणेकरांनी कर पण भरायचा आणि स्वत: रस्त्यावरचे खड्डे पण भरायचे, अशी वेळ शिवसेनेने आणल्याची टीका केली.

ठाणे महापालिकेच्या अंतर्गत सर्व रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे ठाणेकर नागरिकांचा जिवाशी खेळ होत आहे. मणक्यांचा विकार, कमरेचा विकार असे अनेक त्रास सर्वसामान्य जनतेस होत आहेत, याविरोधात हे आंदोलन करण्यात आले. पुढच्या महिन्यात गणपतीबाप्पांचे आगमन होणार आहे; परंतु आजही शहरातील खड्डे बुजविले जात नसल्याचा आरोप भाजपचे उपाध्यक्ष विजय त्रिपाठी यांनी केला.

Web Title: BJP filled the pits with labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.