मीरा-भार्इंदर महापालिकेवर फडकला भाजपाचा झेंडाच; शिवसेना वाढली, काँग्रेस घटली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 06:05 AM2017-08-22T06:05:05+5:302017-08-22T06:05:05+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या ९५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ६१ जागांवर दणदणीत विजय मिळवत भारतीय जनता पार्टीने निर्विवाद सत्ता हस्तगत केली. शिवसेना २२ जागा मिळवून दुसºया क्रमांकाचा पक्ष ठरला.

BJP flagged off on Mira Bhaindar Municipal Corporation; Shivsena grew, Congress reduced | मीरा-भार्इंदर महापालिकेवर फडकला भाजपाचा झेंडाच; शिवसेना वाढली, काँग्रेस घटली 

मीरा-भार्इंदर महापालिकेवर फडकला भाजपाचा झेंडाच; शिवसेना वाढली, काँग्रेस घटली 

Next

भार्इंदर/ मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या ९५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ६१ जागांवर दणदणीत विजय मिळवत भारतीय जनता पार्टीने निर्विवाद सत्ता हस्तगत केली. शिवसेना २२ जागा मिळवून दुस-या क्रमांकाचा पक्ष ठरला, तर दोन पुरस्कृत उमेदवारांसह १२ जागी विजय मिळवत काँग्रेस तिसºया स्थानावर राहिली.
राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी आणि स्थानिक असंतुष्टांचा संघर्ष मोर्चा यांचे मतदारांनी शब्दश: पानिपत केले.
या निवडणुकीत ५०९ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत होते. भाजपा, शिवसेनेतच थेट लढत असल्याने प्रचारात त्यांनी परस्परांवर तिखट शब्दांत टीका केल्याने निकालाबाबत उत्सुकता होती. पण मतदारांनी भाजपाच्या हाती पूर्ण बहुमत देत संदिग्धता संपुष्टात आणली. त्यामुळे ठाणे, भिवंडीपाठोपाठ एकाच पक्षाची निर्विवाद सत्ता असलेली मीरा-भार्इंदर ही मुंबई महानगर क्षेत्रातील तिसरी महापालिका ठरली आहे.
मागील पालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला पूर्ण बहुमत नसल्याने सुरुवातीच्या अडीच वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेसची, तर नंतरच्या काळात भाजपा - शिवसेनेची सत्ता होती. मात्र, या वेळी सगळेच पक्ष स्वबळावर लढले.

- शिवसेनेने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याऐवजी आ. प्रताप सरनाईक यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट भाजपाने व माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोन्सा यांचा गट शिवसेनेने फोडल्यानंतर त्या पक्षाची अवस्था केविलवाणी झाली होती. त्याचे प्रत्यंतर निकालात दिसले.

- शिवमूर्ती नाईक, मीलन म्हात्रे आदी असंतुष्टांनी भाजपाला शह देण्यासाठी स्थापन केलेल्या संघर्ष मोर्चाची निकालात शकले उडाली.

दलाल आणि ठेकेदारी गाजली...
भाजपा उमेदवारांच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेची दलाल म्हणून केलेली संभावना आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फक्त निवडणुकांसाठी मुख्यमंत्री मैदानात उतरतात, त्यासाठी ठेकेदारांकडून देणग्या गोळा केल्या जातात आणि नंतर त्याच ठेकेदारांना लाच प्रकरणात अडकवले जाते, असा केलेला आरोप यामुळे शेवटचा टप्पा आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात संपला.

भाजपाने आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मैदानात उतरून जोरदार बॅटिंग केली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेल्या विकास व विश्वासाच्या लाटेचा हा विजय आहे. मी टीम भाजपाचे अभिनंदन करतो. मीरा-भार्इंदरच्या नागरिकांनी आमच्यावर विश्वास टाकला त्याबद्दल आभार!
- देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री

Web Title: BJP flagged off on Mira Bhaindar Municipal Corporation; Shivsena grew, Congress reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.