भाजप सरकारची तीन वर्षे; राष्ट्रवादी काँग्रेसची ठाण्यात जोरदार निदर्शनं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 02:10 PM2017-10-31T14:10:06+5:302017-10-31T14:10:32+5:30

भाजपा सरकारच्या कारकीर्दीला तीन वर्षे झाली आहेत. या तीन वर्षात महागाई, शेतकरी आत्महत्या, घोटाळे मोठ्या प्रमाणात झाले असल्याचा आरोप करत ठाण्यात आज निदर्शन करण्यात आली.

BJP government's three years; NCP's strong demonstration in Thane | भाजप सरकारची तीन वर्षे; राष्ट्रवादी काँग्रेसची ठाण्यात जोरदार निदर्शनं

भाजप सरकारची तीन वर्षे; राष्ट्रवादी काँग्रेसची ठाण्यात जोरदार निदर्शनं

Next

ठाणे - भाजपा सरकारच्या कारकीर्दीला तीन वर्षे झाली आहेत. या तीन वर्षात महागाई, शेतकरी आत्महत्या, घोटाळे मोठ्या प्रमाणात झाले असल्याचा आरोप करत ठाण्यात आज निदर्शन करण्यात आली. आमदार जितेंद्र आव्हाड, ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली.  दरम्यान, देशात आणि राज्यात सध्या अराजकता माजली असून सर्वच संकटांनी जनता हैराण झाली आहे. त्यामुळे जसे इंग्रजांना गो बॅक म्हणत हाकलून लावले हेते. आता या सरकारलाही जनताच गो बॅक करणार आहे, असे यावेळी आनंद परांजपे यांनी म्हंटलं.

फडणवीस सरकारला सत्ता स्थापन करुन तीन वर्षे झाली आहेत. या तीन वर्षांच्या काळात महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. चिक्की- भूखंड घोटाळे, लहान अर्भकांचे मृत्यू, महिलांवरील अत्याचार आदी प्रकार वाढले आहेत. या सर्व प्रकाराला भाजप- शिवसेना सरकारच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. याच अनुषंगाने राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलने छेडणार आहे. या आंदोलनांची सुरुवात ठाणे शहरातून झाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी, तीन वर्षात केलं काय? चिक्की खाल्ली दुसरं काय, अच्छे दिन गायब झाले बुरे दिन नशिबी आले , मोदी सरकारने गायब केले रेशन; गरीबांना ऐकावे लागते नुसते भाषण; वाह रे मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा  तेल,  अन्न झाले महाग , मरण झाले स्वस्त   भाजपचे सरकार झाले मदमस्त; भाजप सरकार की क्या पहचान ,महंगा जिना, सस्ताईमे  लेते जान आदी घोषणा देत जोरदार निदर्शने केली.  या आंदोलनात नगरसेवक  प्रकाश बर्डे, राजन किणी, शानू पठाण, वहिदा खान, अनिता शिंदे, आरती गायकवाड, अपर्णा साळवी,  मोरेश्वर किणी, परिवहन सदस्य सुरेंद्र उपाध्याय, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष मंदार किणे, युवती अध्यक्षा प्रियांका सोनार, माजी नगरसेवक सुरेखा पाटील, अमीत सरय्या, सरचिटणीस प्रभाकर सावंत, संतोष तिवारी, संदीप जाधव, आदी सहभागी झाले होते.     

यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी, तीन वर्षात जनतेचे हित साधण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. राज्यात आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. नाशिकच्या सरकारी रुग्णालयात व्हेंटिलेटर अभावी लहान मुले दगावली आहेत. त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. रोजगार निर्मितीमध्ये हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.  ना खाऊंगा.. ना खाने दुँगा असे म्हणणाऱ्यांच्याच सरकारमधील अनेक मंत्री भ्रष्टचाराने बरबटले आहेत. मुंबई विद्यापीठातील परीक्षांच्या घोळामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले आहे.  शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली गोरगरीब शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे.   महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे आगामी वर्षभरात या सरकारच्या विरोधात मोहीम राबवून त्यांना घरात बसवू, असे ते म्हणाले.  
 

Web Title: BJP government's three years; NCP's strong demonstration in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.