लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी भाजप अल्पसंख्यांकांना शिक्षा करत आहे - आमदार रईस शेख 

By नितीन पंडित | Published: June 28, 2024 07:02 PM2024-06-28T19:02:23+5:302024-06-28T19:02:41+5:30

अल्पसंख्याक समाजासाठी कोणत्याही नवीन योजना या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली नाही.

BJP is punishing minorities for Lok Sabha election results - MLA Raees Shaikh  | लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी भाजप अल्पसंख्यांकांना शिक्षा करत आहे - आमदार रईस शेख 

लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी भाजप अल्पसंख्यांकांना शिक्षा करत आहे - आमदार रईस शेख 

लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात अंतरीम अर्थसंकल्प सादर करण्यात आला.महायुती सरकारने सादर केलेल्या राज्याच्या या अर्थसंकल्पात अल्पसंख्याकांसाठी किंवा वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी भरीव काहीही दिलेले नाही.

अल्पसंख्याक समाजासाठी कोणत्याही नवीन योजना या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली नाही.अर्थसंकल्पात अल्पसंख्याकांची एवढी मोठी निराशा कधीच झाली नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी भाजप अल्पसंख्याकांना शिक्षा करत असल्याचे दिसते अशी प्रतिक्रिया व आरोप भिवंडी पूर्वचे समाजवादी पार्टीच्या आमदार रईस शेख यांनी राज्य सरकारवर केले आहेत.या अर्थसंकल्पातील सर्व घोषणा या जुन्याच घोषणा आहेत त्या नव्याने मांडल्या आहेत. अल्पसंख्याकांच्या महत्त्वाच्या विषयांकडे या अर्थसंकल्पात पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याचेही आमदार रईस शेख यांनी यावेळी सांगितले

Web Title: BJP is punishing minorities for Lok Sabha election results - MLA Raees Shaikh 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.