विजबिल वाढीच्या निषेधार्थ उल्हासनगरात भाजपचे टाळे ठोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:46 PM2021-02-05T18:46:48+5:302021-02-05T18:48:14+5:30
शुक्रवारी दुपारी भाजपने शहर पूर्वेतील गांधी रोड येथील वीज कार्यालय बाहेर टाळे ठोक आंदोलन केले.
उल्हासनगर : कोरोना काळातील वाढीव वीजबिलाच्या निषेधार्थ भाजपने शहर पूर्वेतील वीज मंडळाच्या कार्यालया समोर टाळे ठोक आंदोलन केले. शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्यानेतृत्वाखाली शेकडोजण आंदोलनात सहभागी झाले होते.
राज्य सरकारने कोरोना काळात भरमसाठ आलेले, वीज बिले माफ करण्याचे संकेत दिले होते. मात्र वाढीव वीज बिल माफ न करता, थकीत वीज बिल ग्राहकांची वीज जोडणी खंडित करण्यासाठी दमदाटी सुरू केल्याचा आरोप भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांनी केली.
शुक्रवारी दुपारी भाजपने शहर पूर्वेतील गांधी रोड येथील वीज कार्यालय बाहेर टाळे ठोक आंदोलन केले. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे भाजपला वीज मंडळाच्या कार्यालयाला टाळे ठोकता आले नाही. यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात नगरसेवक मनोज लासी, अर्चना करणकाळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, महिला विंगच्या सदस्यां सहभागी झाले होते. मात्र आमदार कुमार आयलानी आंदोलनात सहभागी झाले नसल्याने, भाजपातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली.