भाजपा आमदार किसन कथोरेंनी धरला ठेका; बाजार समिती निवडणुकीतील विजयानंतर आनंद साजरा 

By पंकज पाटील | Published: May 1, 2023 06:08 PM2023-05-01T18:08:26+5:302023-05-01T18:08:43+5:30

उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ पैकी तब्बल १५ जागा भाजपने कथोरे यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्यानंतर कार्यकर्त्यांनी किसन कथोरे यांच्या निवासस्थानी आनंद साजरा केला.

BJP MLA Kisan Kathore dance on celebrations after the victory in APMC elections | भाजपा आमदार किसन कथोरेंनी धरला ठेका; बाजार समिती निवडणुकीतील विजयानंतर आनंद साजरा 

भाजपा आमदार किसन कथोरेंनी धरला ठेका; बाजार समिती निवडणुकीतील विजयानंतर आनंद साजरा 

googlenewsNext

बदलापूर : भाजपचे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी रविवारी रात्री कार्यकर्त्यांसोबत ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १८ पैकी तब्बल १५ जागा भाजपने कथोरे यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्यानंतर कार्यकर्त्यांनी किसन कथोरे यांच्या निवासस्थानी आनंद साजरा केला. यावेळी कथोरे हे देखील कार्यकर्त्यांच्या आनंदात सहभागी झाले. 

उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आज पार पडली. १८ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत तब्बल ३३ उमेदवार रिंगणात असतानाही भाजपने तब्बल १५ जागांवर विजय मिळवत या बाजार समितीवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले. या विजयानंतर सर्वच विजयी उमेदवारांनी आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि आनंद साजरा केला. यावेळी आमदार किसन कथोरे हे देखील कार्यकर्त्यांच्या आनंदात सहभागी झाले आणि त्यांनी बँडच्या तालावर ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. 

'शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा इगो आडवा आला' 
स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांवर मात्र कथोरे यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपा आणि शिवसेना यांनी एकत्र निवडणूक लढवली असती, तर ही निवडणूक बिनविरोध करण्याची माझी तयारी होती. त्यासाठी शिवसेनेला पाच जागा सोडण्याचीही तयारी मी दर्शवली होती. परंतु शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा इओ आडवा आला आणि त्यामुळे ही युती झाली नाही आणि आता त्यांना अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले, असा गौप्यस्फोट किसन कथोरे यांनी केला. 

अंबरनाथ ग्रामीणमध्ये युतीत दरी
कथोरे यांच्या या गौप्यस्फोटामुळे स्थानिक पातळीवर ग्रामीण भागात भाजप आणि शिवसेना यांच्यात दुफळी असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समिती ही आधी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचा भाग होती. मात्र आमदार किसन कथोरे यांनीच प्रशासकीय स्तरावर प्रयत्न करून ही बाजार समिती वेगळी करून घेतली. तेव्हापासून सलग आमदार किसन कथोरे यांचेच या बाजार समितीवर वर्चस्व राहिले आहे. 

Web Title: BJP MLA Kisan Kathore dance on celebrations after the victory in APMC elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.