'अनिल देशमुखांची मिरवणूक काढून राष्ट्रवादीने राजकीय संस्कृतीला फासला काळीमा" भाजपा आमदार निरंजन डावखरे यांची टीका 

By जितेंद्र कालेकर | Published: December 29, 2022 06:52 PM2022-12-29T18:52:23+5:302022-12-29T18:52:50+5:30

Niranjan Davkhare : भ्रष्टाचा-यांचे उदात्तीकरण करणा-या या संस्कृतीमुळे महाराष्ट्राची मान लाजेने खाली गेल्याची टीका भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी गुरुवारी केली

BJP MLA Niranjan Davkhare's criticism of 'NCP has tarnished the political culture by removing Anil Deshmukh's procession' | 'अनिल देशमुखांची मिरवणूक काढून राष्ट्रवादीने राजकीय संस्कृतीला फासला काळीमा" भाजपा आमदार निरंजन डावखरे यांची टीका 

'अनिल देशमुखांची मिरवणूक काढून राष्ट्रवादीने राजकीय संस्कृतीला फासला काळीमा" भाजपा आमदार निरंजन डावखरे यांची टीका 

Next

- जितेंद्र कालेकर

ठाणे - भ्रष्टाचारावर कठोर नियंत्रणासाठी महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार लोकायुक्त कायद्याचा मसुदा विधिमंडळात संमत करून घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगवास भोगणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनमुक्तीचा सोहळा साजरा करीत होते. भ्रष्टाचा-यांचे उदात्तीकरण करणा-या या संस्कृतीमुळे महाराष्ट्राची मान लाजेने खाली गेल्याची टीका भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी गुरुवारी केली.

देशमुख यांना प्रकृतीच्या कारणावरून न्यायालयाने जामिनावर सोडले. तुरुंगाबाहेर आलेल्या देशमुखांना स्वातंत्र्ययोद्ध्यासारखा सन्मान देत त्यांची मिरवणूक काढणाºया राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्टाचाराने बरबटलेला चेहरा पुन्हा एकदा समोर आला आल्याचेही डावखरे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे .  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना गृहमंत्री असलेले अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या खंडणी वसुलीचा आरोप झाला, तेव्हाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे सरकार त्यांना पाठीशी घालत होते. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर येत असताना त्यामध्ये गुंतलेल्यांची पाठराखण करत खुद्द उद्धव ठाकरे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत होते. गुंडगिरी, मारहाण, भ्रष्टाचार, खून असे आरोप असलेल्या मंत्री आणि अधिकाºयांच्या  बचावासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लावली जात होती. तरीही अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत आदी नेत्यांना गजाआड जावेच लागले. संजय राऊत आणि अनिल देशमुख यांना न्यायालयाने आरोपमुक्त केलेले नाही, त्यांची निर्दोष मुक्तता झालेली नाही, तर ते जामिनावर बाहेर आले आहेत.

अनिल देशमुख, संजय राऊत आदींची निर्दोष मुक्तता झालेली नाही. त्यामुळे पुन्हा त्यांना तुरुंगात जायची वेळ येईल, तेव्हा पुन्हा मिरवणुकीने त्यांची पाठवणी करणार का, असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.

Web Title: BJP MLA Niranjan Davkhare's criticism of 'NCP has tarnished the political culture by removing Anil Deshmukh's procession'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.