भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी सहकुटुंब केला राज्य सरकारचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 12:33 PM2020-05-22T12:33:31+5:302020-05-22T12:34:32+5:30
भाजपने राज्य सरकारविरोधात आज राज्यात सर्वत्र आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. ‘आंगण ते रणांगण’ या शिर्षकाखाली राज्यातील अनेक भाजपा नेते आणि कार्यकर्ते आंदोलन करत आहेत.
डोंबिवली - राज्य सरकार विरोधात भाजपने आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली असून डोंबिवलीतील भाजप आमदार आणि माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सहपरिवार आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले.
भाजपने राज्य सरकारविरोधात आज राज्यात सर्वत्र आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. ‘आंगण ते रणांगण’ या शिर्षकाखाली राज्यातील अनेक भाजपा नेते आणि कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात करोना संक्रमितांची वाढती संख्या, आरोग्य व्यवस्थेचा उडलेला बोजावारा, कापूस उचल, आंबा आणि काजू उत्पादकांना योग्य तो दर दिला तसेच गणेश मूर्ती बनवणार्या मूर्तिकार कलेला काही सहकार्य करावे यासह आदी अनेक मुद्द्यांचे मजकूर असलेले फलक हातात घेवून रविंद्र चव्हाणांनी सहपरिवार आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले.