भाजपा आमदाराच्या संघटनेने पुकारलेला संप सुरुच,  चौथ्या दिवशीही प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 10:31 PM2017-12-26T22:31:32+5:302017-12-26T22:31:35+5:30

ऐन सुट्या व नाताळ सणात मीरा भार्इंदर महापालिकेची बससेवा बंद पाडणारया भाजपा आमदाराच्या कर्र्मचारी संघटनेने संपाची भुमिका कायम ठेवली असतानाच दुसरी कडे आयुक्तांनी देखील आक्रमक

The BJP MLA's organization has started the talks, and on the fourth day, | भाजपा आमदाराच्या संघटनेने पुकारलेला संप सुरुच,  चौथ्या दिवशीही प्रवाशांचे हाल

भाजपा आमदाराच्या संघटनेने पुकारलेला संप सुरुच,  चौथ्या दिवशीही प्रवाशांचे हाल

Next

मीरारोड - ऐन सुट्या व नाताळ सणात मीरा भार्इंदर महापालिकेची बससेवा बंद पाडणारया भाजपा आमदाराच्या कर्र्मचारी संघटनेने संपाची भुमिका कायम ठेवली असतानाच दुसरी कडे आयुक्तांनी देखील आक्रमक भुमिका घेत मंगळवारी सायंकाळ पासुन बेस्ट बसची सेवा उत्तन मार्गावर सुरु केल्याने संपकरी धास्तावले आहेत. त्या आधी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन लोकांना वेठीस धरणारयांवर कारवाई करा आणि पर्यायी व्यवस्था करा अन्यथा नागरीकांसह शिवसेना रस्त्यावर उतरेल. उत्तनला कचरयाची एकही गाडी जाऊ देणार नाही असा इशारा दिला.

महापालिकेत सत्ता असुन ही भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या अध्यक्षते खालील श्रमिक जनरल कामगार युनियनच्या परिवहन उपक्रमाच्या कंत्राटी कर्मचारयांना किमान वेतनातील फरक, कमी मिळालेले वेतन आदी समस्या सोडवण्यात यश आले नाही. त्यातच शुक्रवार पासुन आ. मेहतांच्या नेतृत्वाखाली कंत्राटी कर्मचारयांनी अचानक संप सुरु करुन बस सेवा बंद पाडली.

या मुळे सुट्या तसेच नाताळच्या सणात मुर्धा ते उत्तन - चौक, गोराई, काशिमीरा, हाटकेश, कनकिया आदी भागातील हजारो प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. रिक्षावाल्यांनी देखील अव्वाच्या सव्वा भाडं आकारुन प्रवाशांना नाडण्यास सुरवात केली.

शूक्रवार पासुन संप सुरु झाला असताना देखील पालिका प्रशासन केवळ सत्ताधारी भाजपा समोर बघ्याची भुमिका घेत होतं. शिवसेनेने सत्ताधारी भाजपा व प्रशासनाच्या निषेधाचे फलक लावले. मंगळवारी दुपारी शिवसेनेचे मीरा भार्इंदर विधानसभा प्रमुख अरुण कदम सह नगरसेविका हेलन गोविंद, शर्मिला बगाजी, अर्चना कदम, नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर, शहर प्रमुख प्रकाश मांजरेकर आदिंसह शिवसैनिकांनी आयुक्तांची भेट घेऊन संताप व्यक्त केला.

पालिकेने तातडीने बेस्ट, टिएमटी ची सेवा सुरु करावी, रिक्षा चालक संघटनांशी बोलुन रास्त भाडे आकारावे, खाजगी बसना सेवा देण्यास सांगावे आदी मागण्या करत प्रवाशी संतापले असुन शिवसेना त्यांच्या सोबत रस्त्यावर उतरेल. वेळ पडल्यास उत्तनच्या डंपीग ग्राऊण्ड ला जाणारया कचरयाच्या गाड्या अडवु असा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला. आयुक्तांनी देखील कंत्राटी कर्मचारयांची देणी देण्यासाठी आर्थिक तरतुद केली जात असल्याचे सांगुन बेस्ट व टिएमटीशी बोलणी सुरु असल्याचे सांगीतले.

दरम्यान सायंकाळ पासुन बेस्टच्या चार बस उत्तन मार्गावर सुरु करण्यात आल्या आहेत. या मुळे संपकरी धास्तावले असले तरी पालिकेने मात्र कर्मचारयांची थकित देणी देण्यासाठी वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. बेस्टची सेवा सुरु झाल्याने उत्तन भागातील प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

आ. मेहता यांनी रात्री नगरभवन येथे संपकरी कर्मचारयांची भेट घेऊन भाजपा देखील आंदोलना पाठीशी असल्याचे आश्वासन दिल्याचे कर्मचारयाने सांगीतले. तर पालिकेने बेस्ट बस सुरु केल्या नंतर भार्इंदर पोलीसांना देखील संपकरयां कडुन कायदा सुव्यवस्था बिघडवली जाऊ नये म्हणुन बंदोबस्त ठेवण्याची विनंती केली आहे.

Web Title: The BJP MLA's organization has started the talks, and on the fourth day,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.