‘आणीबाणी’च्या निषेधार्थ आज भाजप पाळणार ‘काळा दिवस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:28 AM2021-06-25T04:28:14+5:302021-06-25T04:28:14+5:30
डोंबिवली : स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील काळा इतिहास म्हणून नोंदल्या जाणाऱ्या आणीबाणीतील अत्याचार आणि दडपशाहीच्या कहाण्या देशातील तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी शुक्रवारी ...
डोंबिवली : स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील काळा इतिहास म्हणून नोंदल्या जाणाऱ्या आणीबाणीतील अत्याचार आणि दडपशाहीच्या कहाण्या देशातील तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी शुक्रवारी राज्यभर काळा दिवस पाळण्यात येणार आहे. या विषयासंदर्भात विविध संवाद कार्यक्रम केले जाणार आहेत. याबाबत भारतीय जनता युवा मोर्चा राज्यभरात संयोजन करीत आहे, अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे मिहिर देसाई यांनी शुक्रवारी माध्यमांना दिली.
२५ जून १९७५ या दिवशी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. त्यानंतर देशभर दमनसत्र सुरू झाले. अत्याचार व दडपशाहीमुळे या काळात काँग्रेसने सत्तेचा व बळाचा अमानुष वापर करून देशभर भयाचे व असुरक्षिततेचे वातावरण तयार केले हाेते. मानवाधिकारांचे व माध्यम स्वातंत्र्याचे हनन करणाऱ्या या काळातील काँग्रेसी अत्याचारांची कहाणी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा स्तरावर भाजप व्हिडिओ कॉन्फरन्स, समाजमाध्यमांद्वारे आणीबाणीच्या जखमांच्या जाणिवा समाजास करून देणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.