भाजपाने जोडो मारो आंदोलन करत केला महाविकास आघाडीचा निषेध
By नितीन पंडित | Published: October 21, 2023 03:13 PM2023-10-21T15:13:48+5:302023-10-21T15:14:20+5:30
महायुतीच्या सरकारने शरद पवार,उद्धव ठाकरे व काँग्रेसचे पदाधिकारी या ढोंगी शासनकर्त्यांचं पाप उघडे पाडले असून, राज्यातील तरुणांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम हे करीत असल्याने आम्ही त्यांचा निषेध करतो अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष अड. हर्षल पाटील यांनी दिली आहे.
भिवंडी: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाचा कंत्राटी भरतीचा अध्यादेश रद्द केल्याचे जाहीर केले. तसेच, कंत्राटी भरती पद्धती ही काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या काळात सुरू झाली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कंत्राटी भरती संबंधित नऊ कंपन्यांना ठेका दिला होता, असा पलटवार केला. यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या आदेशा नंतर भिवंडीत शनिवारी भाजपा शहराध्यक्ष अॅड हर्षल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी विरोधात निषेध आंदोलन करीत शरद पवार, उद्धव ठाकरे,पृथ्वीराज चव्हाण यांच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांच्या फोटोला महिला कार्यकर्त्यांनी जोडे मारून आपला संताप व्यक्त केला आहे.
या आंदोलनात शहराध्यक्ष अँड हर्षल पाटील,भिवंडी पूर्व विधानसभा प्रमुख संतोष शेट्टी,सरचिटणीस राजू गाजंगी, महीला मोर्चा अध्यक्षा सुनीता टावरे,शहर उपाध्यक्ष सुमित पाटील,यशवंत टावरे,निष्काम भैरी,प्रदेश कार्यकारणी सदस्य श्याम अग्रवाल,रेखा पाटील,कल्पना शर्मा,महिला पदाधिकारी वैशाली पाटील ,संगीता दोंदे ,नंदन गुप्ता यांसह मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कंत्राटी भरतीचे पाप हे काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचे असून २००४ मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळापासून त्यांनी याची सुरुवात केली. त्यामुळे महायुतीच्या सरकारने शरद पवार,उद्धव ठाकरे व काँग्रेसचे पदाधिकारी या ढोंगी शासनकर्त्यांचं पाप उघडे पाडले असून, राज्यातील तरुणांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम हे करीत असल्याने आम्ही त्यांचा निषेध करतो अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष अड. हर्षल पाटील यांनी दिली आहे.