अंबरनाथमध्ये भाजपकडून ठाकरे सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:46 AM2021-09-12T04:46:05+5:302021-09-12T04:46:05+5:30
अंबरनाथ : मुंबईच्या साकीनाका परिसरात एका महिलेसोबत घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. अंबरनाथमध्येही भाजपच्या महिला ...
अंबरनाथ : मुंबईच्या साकीनाका परिसरात एका महिलेसोबत घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. अंबरनाथमध्येही भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत आरोपीला फाशी द्या, अशी मागणी केली आहे.
मुंबईच्या साकीनाका परिसरात एका महिलेसोबत अत्यंत निर्दयीपणे अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर नाजूक अवस्थेत असलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेबाबत राज्यभरातून संताप व्यक्त होत असतानाच, अंबरनाथमधील भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी या बलात्काराच्या आरोपीला फाशी द्या, अशी मागणी केली आहे. ठाकरे सरकारच्या काळात राज्यातील महिला असुरक्षित असून, आम्हाला एकटीला घराबाहेर पडायला भीती वाटते, अशी भावना या महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला लाभलेले दुर्दैवी मुख्यमंत्री असून, जे एका महिला अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर तिला बघायलासुद्धा येत नाहीत, मात्र ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात, अशी बोचरी टीका भाजपचे अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजित करंजुले यांनी केली.