थीम पार्क भ्रष्टाचारावर भाजपचे वस्त्रहरण; लबाडी झाली उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 11:32 PM2019-11-19T23:32:39+5:302019-11-19T23:32:58+5:30

शिवसेना-राष्ट्रवादीसमोर भाजप सदस्य पडले एकाकी

BJP robes over theme park corruption; The lie was exposed | थीम पार्क भ्रष्टाचारावर भाजपचे वस्त्रहरण; लबाडी झाली उघड

थीम पार्क भ्रष्टाचारावर भाजपचे वस्त्रहरण; लबाडी झाली उघड

Next

ठाणे : थीम पार्कच्या भ्रष्टाचाराबाबत सभागृहात प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचा बुरखा फाडण्याची भाषा करणाºया भाजपचेचे वस्त्रहरण झाल्याचे चित्र मंगळवारी ठाणे महापालिकेच्या महासभेत दिसले. याविषयावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्ताधारी शिवसेनेने भाजप सदस्यांनी केलेली लबाडी उघड करून खुले आव्हान दिले.

थीम पार्कचा भ्रष्टाचार सर्वात आधी राष्ट्रवादी काँग्रेसने सभागृहात उघड केला. त्यानंतर सर्वपक्षीयांच्या समितीने हा अहवाल तयार केला.
मात्र भाजप सदस्यांचे ड्राफ्ट बनवण्यामध्ये कोणत्याही प्रकारचे योगदान नसताना, या अहवालाचे श्रेय घेऊन तो परस्पर फोडल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला. अशाप्रकारे समितीचा अहवाल हा स्वत: तयार केल्याचे भासवून सत्ताधाऱ्यांचा बुरखा फाडण्याची भाषा करणाºया भाजपच्या नगरसेवकांनी हिंमत असेल तर हे आरोप सिद्ध करून दाखवावेच असे खुले आव्हान शिवसेनेने दिले. या संपूर्ण वादंगामध्ये मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना विरोधात भाजप असे चित्र सभागृहात पाहायला मिळाले. भ्रष्टाचाराच्या अहवालाचे श्रेय घेण्यावरूनदेखील तीनही पक्षांमध्ये संघर्ष दिसला.

मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी थीम पार्कच्या विषयाला हात घालताना सांगितले की, सर्वात आधी या भ्रष्टाचाराचा विषय सभागृहात मी सादर केला. त्यानंतर एक समिती स्थापन केल्यानंतर मिलिंद पाटणकर यांनी यासंदर्भात मसुदा तयार केला असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.

मात्र, ज्यांनी हा भ्रष्टाचार उघड केला आणि ज्यांनी सर्व तांत्रिक मुद्यांचा अभ्यास करून मसूदा तयार केला ते सर्व राहिले बाजूला. मात्र ज्यांचे काही योगदान नाही ते मात्र या सर्व गोष्टींचे श्रेय घेण्यासाठी समोर आले आहेत, असा आरोप त्यांनी नारायण पवार यांच्यावर केला. अशा प्रकारे जर समितीचा अहवाल विश्वासात न घेता फोडला जात असेल, तर मग जेव्हा स्थायी समितीसमोर या विषयाला का वाचा फोडली नाही, त्यावेळी कोणत्या नेत्याचा दबाव होता, कोणत्या नेत्याचे फोन त्यावेळी आले होते, असे अनेक प्रश्न त्यांनी सभागृहात करून भाजपला भंडावून सोडले.

सभागृह नेते नरेश म्हस्के थीम पार्कचा विषय का बंद झाला, त्यानंतर तो का सोडून दिला, असे आरोप भाजपवर करून इतर पक्षांनी पाठ फिरवल्याचा आरोप भाजपने करू नये असे खडेबोल सुनावले. सभागृहाच्या संमतीने समिती स्थापन होऊन त्याचा अहवाल सर्वांच्या संमतीने सभागृहात सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र, अहवाल हा परस्पर सादर करून आम्ही पोलीस आणि इतर पक्ष चोराच्या भूमिकेत असल्याचे दाखवणे ही भाजपची भूमिका योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. विषयपत्रिका जर पालिकेच्या एखाद्या लिपिकाने टाईप केली असेल तर ते विषय त्याने सुचवले नसतात, असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला.

श्रेयवादामुळे अहवाल सादर झालाच नाही
थीमपार्क भ्रष्टाचाराचा अहवाल तयार करण्यावरून सभागृहात कमालीचा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र, या सर्व वादंगामध्ये तो सभागृहात सादर होऊ शकला नाही. गेले अनेक महिने या अहवालाची सर्वांना प्रतीक्षा होती, तसेच नगरसेवक यावर या भूमिका घेणार याबाबतदेखील उत्सुकता होती. मात्र, यासंदर्भात कोणतेही पाऊल सभागृहात उचलले गेले नाही.

नारायण पवार पडले उघडे
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे हे मुद्दे खोडून काढण्याचा भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी प्रयत्न केला. मात्र, त्यांना आपले म्हणणे प्रभावीपणे मांडता आले नाहीत. यासंदर्भात जी समिती स्थापन केली होती, त्या समितीमध्ये प्रत्येक सदस्यांनी वैयक्तिक अहवाल सादर करावा असे ठरले होते. त्यामुळे भाजपच्या दोन सदस्यांनी हा अहवाल महापौरांकडे सादर केला असल्याचे पवार यांनी सभागृहात सांगितले. या मुद्यावर नजीब मुल्ला यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून असा कोणताही विषय समितीमध्ये झाला नसल्याचे सांगितले. महापौर मीनाक्षी शिंदे यांनीही असा कोणताही विषय झाला नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर पवार अक्षरश: उघडे पडले. त्यानंतर हा अहवाल सर्व नगरसेवकांना देण्यात यावा अशी मागणी नजीब मुल्ला आणि मिलींद पाटणकर यांनी सभागृहात केल्यावर या वादावर पडदा पडला .

Web Title: BJP robes over theme park corruption; The lie was exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.