कचऱ्याच्या ठेक्यासाठी भाजप-शिवसेना एकत्र; उल्हासनगर महापालिकेत घडला चमत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 04:57 PM2022-03-30T16:57:29+5:302022-03-30T16:58:50+5:30

उल्हासनगर महापालिका महासभेत अखेर कचऱ्याच्या ठेक्याला मंजुरी, ठेका दुप्पट किंमतीला?

BJP-Shiv Sena together for waste contract in Ulhasnagar Corporation | कचऱ्याच्या ठेक्यासाठी भाजप-शिवसेना एकत्र; उल्हासनगर महापालिकेत घडला चमत्कार

कचऱ्याच्या ठेक्यासाठी भाजप-शिवसेना एकत्र; उल्हासनगर महापालिकेत घडला चमत्कार

Next

सदानंद नाईक

उल्हासनगर : महापालिका आयुक्तांच्या कचऱ्याचा ठेका मागे घेण्याच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवून समिती सदस्यांनी कचरा उचलण्याचा ठेक्याला एकमताने मंजुरी दिली. ८ वर्षासाठी २४० कोटींचा खर्च येणार असून गेल्या वेळे पेक्षा दुप्पट खर्च येणार असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे शहाराध्यक्ष रोहित साळवे व साई पक्षाचे जीवन इदनांनी यांनी लेखी स्वरूपात आयुक्तांना केली. उल्हासनगर महापालिकेची मुदत ४ एप्रिल रोजी संपत असून त्यानंतर प्रशासकीय राजवट लागू होणार आहे. त्यापूर्वी महासभा व स्थायी समिती बैठकीचा धडाका लागला असून कोट्यवधीं कामाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जात आहे. या प्रकाराने शहरातील वातावरण ढवळून निघाले.

सर्वात चर्चेतील शहरातील कचरा उचलण्याचा ठेका ८ वर्षासाठी कोणार्क कंपनीला बहुमताने देण्याला स्थायी समितीने मंजुरी दिली. यासाठी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले शिवसेना व भाजप सदस्य एकत्र आल्याचे चित्र होते. शहरातील कचरा उचलण्यासाठी दिवसाला ८ लाख २२ हजार, महिन्याला २ कोटी ४७ लाख तर वर्षाला ३० कोटी ८० लाख रुपये खर्च येणार आहे. तर ८ वर्षासाठी २४० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. गेल्या वेळी दरदिवशी साडे चार लाख रुपये कचरा उचलण्यावर होता. तो खर्च आता दुपटीने पेक्षा जास्त किमतीवर गेल्याचा आरोप काँग्रेस, मनसे व साई पक्षाने करून, याविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे संकेत त्या नेत्यांनी दिले.

महापालिका तिजोरीत ठणठणाट असतांना कचऱ्याचा ठेक्या बरोबर खेमानी नाला येथे विधुत यंत्रणा बसविण्यासाठी ३७ लाख ३४ हजार, हवा प्रदूषण मशीन बसविण्यासाठी ९९ लाख, खेमानी चौक ते आंबेडकर रस्त्यासाठी २ कोटी ७७ लाख, मच्छी मार्केट ते सोनार गल्ली रस्त्यांसाठी २ कोटी तसेच हिरा मॅरेज रस्त्यासाठी ३ कोटी आदी प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. गुरवारी पुन्हा स्थायी समितीची बैठक होणार असून भाडेतत्त्वावर खाजगी रुग्णालय घेण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. या विषयवर शिवसेना व भाजप सदस्य एकत्र येणार आहेत चौकट कचऱ्याचा ठेक्याचे प्रकरण न्यायालयात? महापालिका स्थायी समितीची मुदत एक दिवस संपण्याच्या आदी ८ वर्षासाठी २४० कोटीचा कचरा उचलण्याचा ठेका तसेच कोट्यवधी रुपयांचे इतर प्रस्तावाची कामे, स्वतःचे रुग्णलाय धूळ खात पडले असतांना, दरमहा २३ लाख भाडेतत्त्वावर खाजगी रुग्णलाय घेने आदी प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली

Web Title: BJP-Shiv Sena together for waste contract in Ulhasnagar Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.