‘संक्रमण शिबिरे तयार करताना भाजपला विचारात घ्यावे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:42 AM2021-05-07T04:42:50+5:302021-05-07T04:42:50+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत सखल भागांतील नागरिकांसाठी संक्रमण शिबिरांची तयारी करा, ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत सखल भागांतील नागरिकांसाठी संक्रमण शिबिरांची तयारी करा, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत. मात्र, संक्रमण शिबिरे तयार करताना भाजपला विचारात घ्यावे, अशी मागणी भाजपच्या कल्याण जिल्हा महिला सरचिटणीस पुष्पा रत्नपारखी यांनी आयुक्तांकडे केली आहे.
केडीएमसीचा स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सीटी पार्कचा प्रकल्प गौरीपाडा येथे सुरू आहे. हा प्रकल्प वालधुनी नदीनजीक असून, तेथे प्रकल्पासाठी भराव टाकण्यात आला आहे. वालधुनी नदीला दरवर्षी अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती उद्भवते. त्याचे घोलपनगर, योगीधाम, अनुपमनगर या ठिकाणच्या सखल भागांतील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरते. त्यामुळे या नागरिकांसाठी संक्रमण शिबिरांची व्यवस्था करण्यापूर्वी भाजपला विचारात घ्यावे. त्यानुसार संक्रमण शिबिरांची कुठे व कशा प्रकारे किती गरज आहे, याची सूचना केली जाईल, याकडे रत्नपारखी यांनी लक्ष वेधले आहे.
---------------