ऐनवेळी शिवसेनेने दिला राष्ट्रवादी काँग्रेसला डच्चू; कल्याणमध्ये थेट भाजपाशी हातमिळवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 12:45 PM2020-07-06T12:45:04+5:302020-07-06T12:45:24+5:30
कल्याण पंचायत समितीत शिवसेनेनं थेट भाजपाशी हातमिळवणी करत राष्ट्रवादीला काँग्रेसला झटका दिला आहे.
कल्याण – राज्यात एकीकडे सत्तेत एकत्र असणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रकार सुरु केले आहेत. स्थानिक पातळीवर अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेच्या ५ नगरसेवकांना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश देऊन शिवसेनेला शह दिला. त्याची परतफेड म्हणून शिवसेनेने कल्याणमध्येराष्ट्रवादी काँग्रेसला मात दिली.
कल्याण पंचायत समितीत शिवसेनेनं थेट भाजपाशी हातमिळवणी करत राष्ट्रवादीला काँग्रेसला झटका दिला आहे. अलीकडेच कल्याण पंचायत समितीची सभापती आणि उपसभापती निवडणूक पार पडली. याठिकाणी भाजपाचे ५, शिवसेनेचे ४, राष्ट्रवादीचे ३ नगरसेवक आहेत. राज्यात एकत्रित सत्तेत असल्यामुळे पंचायत समितीत शिवसेना-राष्ट्रवादीचे सभापती-उपसभापती सहज निवडून येतील असे सांगण्यात येत होते.
सभापती आणि उपसभापती पद राष्ट्रवादीला देण्याचं जवळपास निश्चित झालं होतं पण अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी रविवारी राजकीय हालचाली वाढल्या. भाजपा आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांशी संपर्क साधला आणि भाजपानं विनाअट शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला. भाजपाच्या ५ सदस्यांच्या पाठिंब्यावर शिवसेनेच्या अनिता वाकचौरे यांची सभापती म्हणून निवड झाली. त्यांना सात मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या दर्शना जाधव यांना ५ मते मिळाली. उपसभापती शिवसेनेचे रमेश बांगर विजयी झाले. त्यांनाही ७ मते मिळाली. तर याठिकाणीही राष्ट्रवादीच्या भरत भोईर यांचा पराभवाचा सामना करावा लागला.
काय झालं होतं पारनेरमध्ये?
राज्याच्या सत्तेत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याआधी पारनेरमध्ये या दोन पक्षांनी सत्तेचं गणित जमवलं होतं. आता मात्र राष्ट्रवादीनं एकहाती सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी अलीकडेच जामखेडमध्ये भाजपाच्या नगरसेवकांना आपल्या ताफ्यात घेतलं. त्या पाठोपाठ, पारनेरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी सत्तेत सोबत असलेल्या शिवसेना शिलेदारांच्या हातावरच घड्याळ बांधलंय. शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्यासाठी हा धक्का ठरू शकतो. मात्र त्यामुळे आता नगरपंचायतीत शिवसेनेचे फक्त दोन नगरसेवक उरलेत. शिवसेनेसाठी पुढची निवडणूक कठीण असेल.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
चीनविरुद्धच्या संघर्षात रशियाने केली भारताची छुप्या पद्धतीनं मोठी मदत
...अन्यथा होणार कारवाई; लॉकडाऊनचं कठोर पालन करण्यासाठी सरकारचे '७ कलमी' आदेश
कोरोनापाठोपाठ आणखी एका विषाणूचा मानवाला धोका; चीनने केला अलर्ट जारी
रुग्णालयाची धक्कादायक ऑफर; २५०० रुपयांत कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट मिळेल
हवेच्या माध्यमातून पसरतोय कोरोना?; २३९ वैज्ञानिकांचा मोठा दावा, WHO ला पाठवलं पत्र