भाजपाने लोकशाहीचा गळा घोटला - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 06:25 AM2018-05-18T06:25:08+5:302018-05-18T06:25:08+5:30

कर्नाटकात भाजपा लोकशाहीचा गळा घोटत आहे. असेच करायचे असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुका न घेता स्वत:च मुख्यमंत्री, राज्यपाल नेमून राज्य करावे, असा उपरोधिक टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी लगावला.

BJP threw democracy - Uddhav Thackeray | भाजपाने लोकशाहीचा गळा घोटला - उद्धव ठाकरे

भाजपाने लोकशाहीचा गळा घोटला - उद्धव ठाकरे

Next

उल्हासनगर : कर्नाटकात भाजपा लोकशाहीचा गळा घोटत आहे. असेच करायचे असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुका न घेता स्वत:च मुख्यमंत्री, राज्यपाल नेमून राज्य करावे, असा उपरोधिक टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी लगावला. ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुका एकत्र घ्या. त्याला आम्ही तयार आहोत. त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असे आव्हानही त्यांनी दिले.
उल्हासनगरमधील गोल मैदान परिसरात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद््घाटनानंतर गोल मैदानातील जाहीर सभेत ते बोलत होते. कर्नाटक, गोवा, मेघालय, बिहार आदी राज्यांत भाजपाने लोकशाहीचा गळा घोटला. त्यांना काहीही करून त्यांच्याच पक्षाचे सरकार बसवायचे असेल, तर निवडणुकाच घेऊ नका. तुमचा जाहिरात खर्च, भाषण, दौरे यांचा वेळ वाचेल. मोदी विदेश दौरे करायला मोकळे होतील. थेट मुख्यमंत्री आणि राज्यपाल नेमून राज्य करा. निवडणुका आल्या, की मंदिर वहीं बनाऐंगेचा नारा सुरू होईल. आता यांची सत्ता आहे. मग मंदिर बांधायला यांचे हात कोणी बांधलेत? यांनी शेतकऱ्यांची दशा केली, जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेची वाट लावली. जकातीच्या उत्पन्नाचे स्त्रोत बंद करून पालिकांना भिकारी केले, अशी टीकाही त्यांनी केली.
मूठभरांच्या हितासाठी उल्हासनगरचा नवा शहर विकास आराखडा मंजूर झाला असून त्यामुळे तीन लाखांपेक्षा जास्त नागरिक बाधित होणार आहे. असा विनाशी विकास आराखडा रद्द केला जाईल, असे आश्वासन त्यांनी सभेत दिले. तेथील व्यापाºयांचे प्रश्न सोडवले जातील आणि प्रदूषणाच्या प्रश्नावर बंद पडलेले जीन्स कारखाने सुरू करण्याचे संकेतही त्यांनी दिले.
उल्हासनगरच्या कामगार रूग्णालयाच्या जागी नवे हॉस्पिटल उभे राहणार असून त्यासाठी केंद्र व राज्य शासनाची मान्यता खासदार शिंदे यांनी आणल्याचे ठाकरे यांनी सांगितले. परवडणाºया घरांच्या नावाखाली मुंबईतील मीठागरांच्या जमिनी हडपण्यास त्यांनी विरोध केला. सत्तेत असूनही कायम जनतेच्या प्रश्नावर आंदोलन केल्याने शेतकरी, सामन्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यास भाजपाला भाग पाडल्याचा दाखलाही त्यांनी दिला.
यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांगडे, आमदार बालाजी किणीकर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर सिंधी समाजासह इतर समाजातील संताना खास आमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्यात आला. एकनाथ शिंदे यांनीही आपल्या भाषणात उल्हासनगरच्या विकास आराखड्याला विरोध असल्याचे जाहीर केले. खासदार शिंदे यांचा कार्य अहवाल यावेळी प्रसिध्द झाला. तसेच त्यांचाय वेबसाईटचे उद्घघाटनही ठाकरे यांच्या हस्ते पार पडले.
>शिवसैनिकांच्या प्रेमाचे टॉनिक
उल्हासनगरातील शिवसैनिकांची प्रचंड गर्दी मला शिवसेनाप्रमुखांसारखे टॉनिक देऊन गेली. त्यामुळे मी तुम्ही आमंत्रित न करताही मी उल्हासनगरात येणार असल्याचे वचन ठाकरे यांनी दिले.

Web Title: BJP threw democracy - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.