सोमवारी भाजप करणार सेवाकार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:29 AM2021-05-29T04:29:31+5:302021-05-29T04:29:31+5:30
ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ३० मे रोजी सात वर्षे पूर्ण होत असून, त्या दिवशी ...
ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ३० मे रोजी सात वर्षे पूर्ण होत असून, त्या दिवशी भाजप ठाणे शहरातील प्रभागांमध्ये कोरोनासंबंधी सेवाकार्य करणार आहे, अशी माहिती आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेली स्थिती लक्षात घेता कोणताही उत्सव होणार नाही, असेही ते म्हणाले.
ठाणे शहरातील विविध प्रभागांमध्ये ३० मे रोजी भाजपचे कार्यकर्ते भेट देतील. तेथील आशा सेविका आणि कोरोनाच्या साथीचा सामना करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा पक्षातर्फे सत्कार करण्यात येईल. तसेच भाजपचे कार्यकर्ते कोरोनासंबंधी सेवाकार्य करणार असून यात भाजपचे खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी सहभागी होतील. यात ३० रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.