कल्याण पूर्वेत भाजपा खाते उघडणार?

By admin | Published: October 12, 2015 04:34 AM2015-10-12T04:34:54+5:302015-10-12T04:34:54+5:30

कल्याण पूर्व भागातून भाजपाला या निवडणुकीत खाते उघडता येईल का? अशी चर्चा आहे. या भागात २०१० ते २०१५ या कार्यकाळात शिवसेनेचे

BJP will open in Kalyan East? | कल्याण पूर्वेत भाजपा खाते उघडणार?

कल्याण पूर्वेत भाजपा खाते उघडणार?

Next

कोळसेवाडी : कल्याण पूर्व भागातून भाजपाला या निवडणुकीत खाते उघडता येईल का? अशी चर्चा आहे.
या भागात २०१० ते २०१५ या कार्यकाळात शिवसेनेचे ११, मनसे ६, राष्ट्रवादी ५, काँग्रेस २ आणि अपक्ष १ असे बळ होते. त्यामध्ये काँग्रेसचे उदय रसाळ, राष्ट्रवादीचे विशाल पावशे व अपक्ष विक्रम तरे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे, तर राष्ट्रवादीच्या माधुरी काळे व निलेश शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. विशेष महत्त्वाचे म्हणजे अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार गणपत गायकवाड यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे संजीवनी प्राप्त झाल्याचा दावा भाजपा करते आहे. कल्याण पूर्वमधून वसंतराव सूर्यवंशी, रमाकांत उपाध्याय व ज्योती गाढवे तसेच नामदेव भोईर यांनी नगरसेवकपद भूषविले. मात्र, भविष्यात हा ठसा कायम ठेवता आला नाही. परिवहन समितीवर अविनाश निकम हे सदस्य होते, तर सध्या सुभाष म्हस्के हे सदस्य आहेत. गायकवाड यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. भाजपाचे अधिकाधिक लोकप्रतिनिधी निवडून आणण्याकरिता त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन दणक्यात केले. अपेक्षित शक्तिप्रदर्शनही झाले. कल्याणमध्ये पूर्वभागातून शिवसेनेने ३ महापौर दिले. त्यांच्याच काळात आनंद दिघे उड्डाणपूल, प्रल्हाद शिंदे उड्डाणपूल, स्कायवॉक, १०० फुटी रस्ता, वालधुनी थ्रू बोगदा व सिमेंटच्या रस्त्याचे प्रकल्प राबवले असल्याचे शिवसेनेचे पदाधिकारी सांगत आहेत. त्यामुळे कल्याण पूर्व मतदार शिवसेनेचाच प्राधान्याने विचार करतील, असे त्यांचे मत आहे. तर, भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शिवसेनेच्या नियोजनशून्य कारभाराला लोक कंटाळले असून ते या वेळेस सत्तापरिवर्तन निश्चित घडवणार आहेत.
कल्याण पूर्वमधील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यावर अपात्रतेच्या कायद्याचा बडगा उगारला गेला आहे, तर अभ्यासू नगरसेवक उदय रसाळ यांच्या मते संख्या वाढेल, असे चित्र नाही. तर, राष्ट्रवादी पक्षाचे विशाल पावशे भाजपामध्ये मागील विधानसभा निवडणुकीत गेले व निलेश शिंदे, माधुरी काळे शिवसेनेत गेले. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी यांचे अस्तित्व पूर्वमध्ये नगण्य झाले असून मनसेचे गड शाबूत राहणार की नाही, अशी शंका आहे. भाजपाला नव्याने कर्तबगार कार्यकर्ते निवडण्याची संधी आहे, तर शिवसेना त्याच चेहऱ्यांना संधी देऊ पहाते आहे.(वार्ताहर)

Web Title: BJP will open in Kalyan East?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.