शिवसेनेने रद्द केलेला कार्यक्रम भाजप घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 11:54 PM2020-02-09T23:54:10+5:302020-02-09T23:54:19+5:30
निरंजन डावखरे : मराठी भाषादिनी डॉ. घाणेकर नाट्यगृहात ‘अथांग सावरकर’
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मराठी भाषादिनी मनोरंजन होत नसल्याचे कारण दाखवून शिवसेनेने रद्द केलेला अभिनेते शरद पोंक्षे यांचा ‘अथांग सावरकर’ हा कार्यक्रम भाजपने ठाण्यात आयोजित केला आहे. मराठी भाषाप्रेमी व सावरकरप्रेमींसाठी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात २७ फेब्रुवारी ला सायंकाळी ७ वाजता तो कार्यक्रम होईल, अशी माहिती भाजपचे ठाणे शहराध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांनी रविवारी दिली.
शिवसेनाप्रणीत स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाने प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यगृहात अथांग सावरकर कार्यक्र माचे आयोजन केले होते. मात्र, पदाधिकाऱ्यांची मनोरंजनात्मक कार्यक्रमाची इच्छा असल्यामुळे शिवसेनेने तो रद्द केला होता. शिवसेना उपनेते असलेल्या अभिनेते शरद पोंक्षे यांना तसे पत्र पाठवून कार्यक्र म रद्द केल्याचे कळवले होते. ठाण्यात भाजपतर्फे होणाºया मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमातच डावखरे यांनी अथांग सावरकर
कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला आहे. घाणेकर नाट्यगृहात २७ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला ठाणेकर नागरिकांबरोबरच सावरकरप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जाज्वल्य विचार आत्मसात करावेत, असे आवाहन आमदार डावखरे यांनी केले आहे.
काँग्रेसमुळे कार्यक्रम रद्द केल्याचा आरोप
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील शिवसेनेचे प्रेम हे बेगडी आहे. शिवसेनेचे दाखवायचे दात व खायचे दात वेगवेगळे असून, आम्ही हिंदुत्ववादी असल्याचा पोकळ आव त्यांच्याकडून आणला जात आहे. महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्र मामुळे व काँग्रेसच्या संभाव्य आक्षेपांच्या भीतीमुळे शिवसेनेला सावरकरांपासून दूर राहावे लागत आहे. त्यामुळे करमणुकीचे कारण दाखवून अथांग सावरकर कार्यक्र म रद्द करण्यात आला, अशी कठोर टीका डावखरे यांनी केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रखर विचार असलेला अथांग सावरकर व मनोरंजनात्मक कार्यक्र म यांची शिवसेनेने केलेली तुलना ही अपमानास्पद आहे. त्याचा प्रत्येक सावरकरप्रेमी निषेध करीत आहे.
सावरकरांबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, असे सांगणाºया शिवसेनेकडून सावरकरांच्या विचारांचा प्रसार करणारा अथांग सावरकर कार्यक्र म रद्द होतो, यावरून शिवसेनेचे सावरकरप्रेम दिसून येते, असे त्यांनी सांगितले.