भाजपाचा वचननामा हिंदी आणि सिंधीतही

By admin | Published: February 14, 2017 02:58 AM2017-02-14T02:58:03+5:302017-02-14T02:58:03+5:30

भाजपाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उल्हासनगरात निवडणूक जाहीरनामा जाहीर करण्यात आला. मालमत्ताकरात

BJP's affirmation in Hindi and Sindhi | भाजपाचा वचननामा हिंदी आणि सिंधीतही

भाजपाचा वचननामा हिंदी आणि सिंधीतही

Next

उल्हासनगर : भाजपाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उल्हासनगरात निवडणूक जाहीरनामा जाहीर करण्यात आला. मालमत्ताकरात ३३ टक्के सूट देण्याचे गाजर देऊन अनेक योजनांना भरीव सहकार्य करण्याचे वचनही त्यांनी या वेळी दिले. आ. नरेंद्र पवार, माजी आ. कुमार आयलानी, ओमी कलानी, दिगंबर विशे या वेळी उपस्थित होते.
शहराला कोट्यवधी रु पयांचे पॅकेज मिळेल, असे वाटत होते. मात्र, नागरिकांच्या पदरी निराशाच पडली. कोणतीही नवीन घोषणा या वेळी करण्यात आली नाही. धोकादायक इमारती, घरांना १८ फूट उंचीचा परवाना, शहर विकास आराखड्याला मंजुरी, वालधुनी नदीचा विकास, पालिका बससेवा सुरू करणे, आवास योजना, बहुमजली पार्किंग सुविधा, डम्पिंग ग्राउंड, पाणीयोजना, शहरभर सीसीटीव्ही, अशा अनेक योजना जाहीर करून निधी आणण्याचे वचन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे.एकहाती सत्ता दिल्यास शहराचा विकास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हा वचननामा हिंदी आणि सिंधी भाषेत प्रसिद्ध करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: BJP's affirmation in Hindi and Sindhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.