सरकारविरोधात अंबरनाथला भाजपचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:34 PM2020-02-25T23:34:08+5:302020-02-25T23:34:38+5:30
आंदोलनात अंबरनाथ,बदलापूर तसेच ग्रामीण भागातून मोठया संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अंबरनाथ : जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना -काँंग्रेस- राष्ट्रवादी काँंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. याचा निषेध करण्यासाठी भाजपने मंगळवारी सकाळी अंबरनाथ तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात अंबरनाथ,बदलापूर तसेच ग्रामीण भागातून मोठया संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फक्त अल्पमुदतीची पीककर्जे माफ करण्याची घोषणा केली आहे. यामुळे बहुसंख्य शेतकºयांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. दोन लाखांवर कर्ज असलेल्या तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाºया शेतकºयांबाबत कर्जमाफी योजनेत कोणताच उल्लेख नाही.
गेल्या महिन्याभरात राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महविकास आघाडी सरकारचा भाजप निषेध करत असल्याचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, माजी नगराध्यक्ष तथा भाजप नेते गुलाबराव करंजुले-पाटील, अंबरनाथ पूर्व मंडळ शहराध्यक्ष अभिजीत करंजुले-पाटील, पश्चिम अध्यक्ष ,राजेश कौठाळे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता भोईर, माजी शहराध्यक्ष विजय खरे, नगरसेविका अनिता भोईर आदी उपस्थित होते.
मुरबाडमध्ये निषेध मोर्चा
मुरबाड : शेतकºयांची फसवणूक, महिलांवरील वाढते अत्याचार आणि लोकोपयोगी विकासकामांना स्थगिती
देण्याच्या विरोधात भाजपने मंगळवारी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे अंदोलन केले. यावेळी निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी महाविकास आघाडी सरकारवर टीकाही करण्यात आली.