ओबीसींना राजकीय आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यासाठी भाजपाचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 05:04 PM2021-12-07T17:04:39+5:302021-12-07T17:04:57+5:30
महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी अध्यादेश काढून सरकार ओबीसी समाजासोबत असल्याचा दिखावा करीत असल्याचा आरोप करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणो : सध्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा राज्यभर चव्हाटय़ावर आला आहे. त्यास अनुसरून या समाजाला राजकीय आरक्षण लागू होईपर्यंत ठिकठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्या, या मागणीसाठी ठाणो जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजपाने मंगळवारी धरणे आंदोलन छेडले. या आंदोलनात कार्यकर्ते मोठय़ासंख्येने सहभागी झाले.
येथील शासकीय विश्रामगृहासमोर आमदार, भाजपा जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या नेतृखाली कार्यकत्र्यानी आज जोरदार निदर्शने करून ओबीसींना आरक्षण लागू होईपयर्ंत निवडणूक कार्यक्रम पुढे ढकल्याची मागणी लावून धरली. यामध्ये भाजपा प्रदेश सचिव संदिप लेले, जिल्हा सरचिटणीस कैलास म्हात्रेंसह राजेश मढवी, सचिन केदारी, नयना भोईर, बाबू रामण्णा, सचिन आळशी, विक्र म भोईर, कुष्णा भुजबळ, भुषण पाटील आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.या आंदोलनकत्र्याच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निवेदन देऊन निवडणूका पुढे ढकलण्याची मागणी केली.
महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी अध्यादेश काढून सरकार ओबीसी समाजासोबत असल्याचा दिखावा करीत असल्याचा आरोपही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करते वेळी ऐकायला मिळाला. आता ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळेपर्यंत राज्यात कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी भाजपाने जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.