खड्ड्यात कागदी होड्या सोडून, वृक्षारोपण करुन भाजपचे ठाण्यात शहरभर आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 07:08 PM2020-08-21T19:08:05+5:302020-08-21T19:10:37+5:30
रस्त्यांची दुरु स्ती न करणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेचा निषेध करत भाजप ठाणो शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विविध भागात शुक्रवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले.
ठाणे - गणेश उत्सव अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपलेला असताना सुद्धा ठाणो शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे जैसे थे आहेत. रस्त्यांची दुरु स्ती न करणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेचा निषेध करत भाजप ठाणो शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विविध भागात शुक्रवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी खडय़ात होडून सोडून आणि वृक्षारोपण करुन प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेचा निषेध करण्यात आला.
कॉंग्रेसने गुरुवारी शहरभर खडय़ांच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर शुक्रवारी भाजपच्या वतीने देखील अशा प्रकारचे आंदोलन करुन प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तीनहात नाका येथे शहर अध्यक्ष निरंजन डावखरे यांच्यासह उपाध्यक्ष विजय त्रिपाठी यांच्यासह पदाधिका:यांनी खडय़ात होडी सोडून आंदोलन केले. तर घोडबंदर रोडवरील मानपाडा सर्कल येथे नगरसेविका स्नेहा आंब्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. घोडबंदर मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची चळण झाली आहे. श्री गणोशाचे आगमन उद्या होणार असून सुद्धा अद्याप खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी सकाळी मानपाडा सर्कल येथे निषेधाचे फलक घेऊन भाजपा कार्यकत्र्यानी घोषणाबाजी केली. तसेच पावसामुळे भरलेल्या खड्ड्यांमध्ये कागदी होड्या सोडल्या. आणि वृक्षारोपणही केले. यावेळी नगरसेवक मुकेश मोकाशी, रमेश आंब्रे, राकेश बोराडे आदींसह इतर पदाधिकारी सहभागी झाले. तर शहराच्या इतर भागातही अशा प्रकारे आंदोलन होत असतांना तिकडे दिव्यातही भाजपच्या पदाधिका:यांनी खडय़ांच्या विरोधात आंदोलन केले. दिव्यात सर्वाधिक खड्डे असल्याने यापूर्वीच भाजपने खड्डे दाखवा बक्षीस मिळवा अशी योजना पुढे आणली आहे. त्यानंतर शुक्रवारी संपूर्ण दिव्यात रस्त्यांची अवस्था बिकट आहे. गणरायचे आगमन होणार असून अद्यापही खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत. जुलै महिन्यात खड्डे बुजविण्याचे बोगस काम करणा:या कंत्रटदारावर कारवाई कधी करणार असा सवाल विजय भोईर यांनी केला. दिवेकरांच्या निशीबी चांगले रस्ते नाहीत, कमीशन खाण्याच्या नादात दिव्याची वाट लावली असल्याचा आरोप भाजप ठाणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष निलेश पाटील यांनी केला.