एसएससी बोर्डाच्या कारभाराविरोधात भाजपचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:35 AM2021-07-26T04:35:54+5:302021-07-26T04:35:54+5:30

डोंबिवली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या (एसएससी बोर्ड) वतीने इयत्ता अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेची ...

BJP's agitation warning against SSC board's management | एसएससी बोर्डाच्या कारभाराविरोधात भाजपचा आंदोलनाचा इशारा

एसएससी बोर्डाच्या कारभाराविरोधात भाजपचा आंदोलनाचा इशारा

Next

डोंबिवली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या (एसएससी बोर्ड) वतीने इयत्ता अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेची नावनोंदणी करण्यासाठी मंडळाने निर्माण केलेले संकेतस्थळ विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेची कसोटी पाहत आहे. ते तातडीने कार्यान्वित न केल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी रविवारी दिला. मंडळाच्या कारभाराप्रमाणेच मंडळाचे संकेतस्थळही बिघडले असून त्यामुळे विद्यार्थी व पालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दहावीच्या परीक्षेच्या निकालावेळी सर्व्हर क्रॅश झाल्यामुळे सुमारे १५ लाख ७५ हजार विद्यार्थ्यांना निकाल समजायला चार ते आठ तास विलंब झाला. आता अकरावी परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी प्रवेश परीक्षेची नावनोंदणी करण्यासाठी तयार केलेले संकेतस्थळ गेल्या आठवड्यापासून बंद आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आले आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापन गुणांचा सर्व्हरही ठप्प झाल्याने निकालाला विलंब होण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना होणाऱ्या मनस्तापाची जबाबदारी मंडळाची आहे, असे त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

-------------------

मराठी-हिंदीचा समावेश करा!

सीईटी परीक्षेसाठी निश्चित केलेल्या विषयांत इंग्रजी, गणित, सामान्य विज्ञान आणि विज्ञान हे विषय आहेत. महाराष्ट्रात मराठी आणि हिंदी भाषा विषयांचा समावेश नाही. यामुळे मायबोली मराठीची आणि राष्ट्रभाषा हिंदीची गळचेपी होणार आहे. शिवाय या माध्यमांतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे. एरवी मराठीचा पुळका आणणारे महाविकास आघाडी सरकार प्रत्यक्षात मराठीची गळचेपी करीत आहे. सीईटी परीक्षेत इंग्रजी सोबत मराठी, हिंदी भाषांचा वैकल्पिक भाषा विषय म्हणून तातडीने समावेश करण्यात यावा, अशीही भाजपची मागणी असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

Web Title: BJP's agitation warning against SSC board's management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.