अनधिकृत बांधकामप्रकरणी आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरुद्ध भाजपची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 12:57 AM2020-12-19T00:57:29+5:302020-12-19T01:02:54+5:30

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या तसेच भाजप गटनेते संजय वाघुले यांच्या पोलीस चौकशीची मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुरु वारी सरनाईक यांनी केली. त्यापाठोपाठ सोमय्या यांनीही शुक्र वारी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात सरनाईक यांच्याविरोधात अनधिकृत बांधकामासंदर्भात तकार अर्ज केला आहे.

BJP's complaint against MLA Pratap Saranaik in unauthorized construction case | अनधिकृत बांधकामप्रकरणी आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरुद्ध भाजपची तक्रार

हिम्मत असेल अब्रुनुकसानीचा दावा ठोका

Next
ठळक मुद्दे *ओसी नसतांनाही विहंग गार्डनची घरे विकली हिम्मत असेल अब्रुनुकसानीचा दावा ठोकाभाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांचे प्रतिआव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: व्होल्टास कंपनी कोविड सेंटरवरील आरोपांना उत्तर देताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या तसेच भाजप गटनेते संजय वाघुले यांच्या पोलीस चौकशीची मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुरु वारी सरनाईक यांनी केली. त्यापाठोपाठ सोमय्या यांनीही शुक्र वारी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात सरनाईक यांच्याविरोधात तकार अर्ज केला आहे. तसेच सरनाईक यांनी केलेल्या १०० कोटींच्या दाव्याचीही त्यांनी खिल्ली उडविली.
सोमय्या यांच्यासह भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी शुक्र वारी शिवसेनेचे ठाण्यातील ओवळा-माजिवडयाचे आमदार सरनाईक यांच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्र ार अर्ज दिला. या तक्रारीमध्ये सोमय्या यांनी म्हटले आहे की, वर्तकनगर येथील विहंग गार्डन सोसायटीमध्ये सरनाईक यांच्या विहंग हौसिंग ए१, ए२, ए३ आणि ए४ तसेच बी१ आणि बी२ या इमारतींचे बांधकाम केले आहे. २००७- २००८ मध्ये वापर परवानासाठी विकासकांनी, सरनाईक यांनी अर्ज केले. ए१ ते ए४ या इमारतींमध्ये काही त्रुटी होत्या. त्या सुधारल्यानंतर पुन्हा त्यांनी ओसीसाठी अर्ज केला. तेंव्हा ठाणे महापालिकेने २००८ मध्ये वापर परवाना दिला. मात्र, बी१ आणि बी२ या इमारतींसाठी तो दिलेला नाही. त्यात अनेक त्रुटी होत्या आणि अनधिकृत बांधकामही होते. त्यामुळे अगदी २०२० पर्यंत बी१ आणि बी२ या इमारतीला वापर परवानाच अर्थात ओसी मिळालेली नाही. त्यामुळेच २०१२ मध्ये ठाणे महापालिका आयुक्तांनी बी१ आणि बी२ या इमारतीचे ९ ते १३ मलले अनधिकृत असून ते तोडण्याचा निर्णय दिला. परंतू, अजूनही हे अनधिकृत बांधकाम जैसे थे तसेच आहे. सरनाईक आणि विकासकाने २००८ मध्ये बी१ इमारतीच्या सदनिका ग्राहकांना विकल्या आहेत. यामध्ये ९ ते १३ मजले अनधिकृत असूनही त्या विकल्या आहेत.
ज्या मध्यमवर्गीयांनी या इमारतीमध्ये घरे खरेदी केली, त्यांची फसवणूक झाली आहे. महापालिकेचेही पैसे दिले नाही. अनधिकृत बांधकाम करुन टीडीआरचेही पैसे वाचविले. त्यामुळेच याप्रकरणी भारतीय दंड विधानाच्या कलम ४२० आणि ४०६ प्रकरणी सरनाईक यांच्याविरुद्ध तक्रार नोंदविण्याची मागणी त्यांनी केली आहे.
* तब्बल १३ वर्ष विहंग गार्डन इमारतींना ओसी मिळाली नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
दरम्यान, सोमय्या यांच्याविरुद्ध सरनाईक केलेल्या १०० कोटींच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याचीही खिल्ली उडवत सोमय्या म्हणाले, सरनाईक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकून दाखवावा.
सरनाईक यांनी सामान्य जनतेची लूट केली असून मोठा भ्रष्टाचारही केल्याचा आरोप त्यांनी केला. या उलट सरनाईकांचा दावा म्हणजे ‘चोर मचाये शोर’ असल्याचेही सोमय्या म्हणाले.
* यासंदर्भात सरनाईक यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही तो होऊ शकला नाही.
‘‘ सोमय्या यांच्या तक्रार अर्जाची तथ्यता तपासून योग्य ती कायदेशीर पडताळणी केली जाणार आहे. त्यासाठी हा तक्रार अर्ज ठाणे महापालिकेकडे वर्ग करण्यात येणार आहे.’’
पंकज शिरसाठ, सहायक पोलीस आयुक्त, वर्तकनगर विभाग

Web Title: BJP's complaint against MLA Pratap Saranaik in unauthorized construction case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.