उल्हासनगरात अवैध धंद्याला ऊत, भाजपचे पोलीस उपायुक्तांना साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 01:44 PM2020-12-12T13:44:44+5:302020-12-12T13:45:48+5:30
उल्हासनगरात गुन्हेगारीच्या संख्येत वाढ झाल्याने, भाजपने चिंता व्यक्त केली. याबाबत भाजपा शिष्टमंडळाने शुक्रवारी पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांची भेट घेऊन शहरातील वाढत्या गुन्हेगारी बाबत माहिती दिली.
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील अवैध धंदे व गुन्हेगारीच्या संख्येत झालेल्या वाढीच्या निषेधार्थ भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांची भेट घेऊन निवेदन दिले. शिष्टमंडळा मध्ये आमदार कुमार आयलानी, शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, मनोज लासी यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.
उल्हासनगरात गुन्हेगारीच्या संख्येत वाढ झाल्याने, भाजपने चिंता व्यक्त केली. याबाबत भाजपा शिष्टमंडळाने शुक्रवारी पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांची भेट घेऊन शहरातील वाढत्या गुन्हेगारी बाबत माहिती दिली. शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात अवैध धंद्या बाबत महिती देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आमदार कुमार आयलानी,भाजपा जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वानी, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, नगरसेवक राजेश वधारीया, मनोज लासी, प्रदीप रामचंदानी यांच्यासह पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आश्वासन देऊन, कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आश्वासन दिले.
शहरात सोरट व मटका जुगार, हुक्का पार्लर चौकाचौकात सुरू असल्याचा आरोप केला जात असून अंमली पदार्थांची विक्री सर्रासपणे होत असल्याचे भाजपा शिष्टमंडळाचे म्हणणे आहे. पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांची नियुक्ती झाल्यावर, गावठी दारू अड्डा, मटका व सोरट जुगार अड्ड्यावर कारवाई सुरू केली. गुन्हे अन्वेषण विभाग व पोलिसांनी मोटारसायकली चोरांना जेरबंद करण्यात आले असून गुन्हेगारी मुक्त शहर करण्याचे संकेत पोलीस उपायुक्त मोहिते यांनी दिले. तर अवैध धंदे बंद न झाल्यास व गुन्हेगारी कमी न झाल्यास भाजप रस्त्यावर उतरण्याचे संकेत यावेळी शिष्टमंडळाने दिले.