मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भाजपचे पूर्ण समर्थन : चंद्रशेखर बावनकुळे

By अनिकेत घमंडी | Published: October 29, 2023 06:25 PM2023-10-29T18:25:15+5:302023-10-29T18:25:32+5:30

भाषण सुरू असताना एका युवकाने एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली, त्याचे जाहीर समर्थन करत बावनकुळे यांनीही व्यासपीठावरून घोषणा दिल्या.

BJP's full support to Chief Minister Eknath Shinde on Maratha reservation issue: Chandrasekhar Bawankule | मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भाजपचे पूर्ण समर्थन : चंद्रशेखर बावनकुळे

मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भाजपचे पूर्ण समर्थन : चंद्रशेखर बावनकुळे

डोंबिवली: मराठा समाजाला आरक्षण मुद्यावर महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपचे पूर्ण समर्थन असून ते आरक्षण मिळायला हवे अशी आमचीही स्पष्ट भूमिका असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले. अमृत कलश आणि कल्याण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा रविवारी डोंबिवली विधानसभेत दौरा होता, त्यावेळी फडके पथ येथील पक्षाच्या जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केले.

त्यांचे भाषण सुरू असताना शिवाजी पाटील या मराठा युवकाने एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली, त्याचे जाहीर समर्थन करत बावनकुळे यांनीही व्यासपीठावरून घोषणा दिल्या, तसेच पाटील यास बोलावून त्यांची विचारपूस करून व्यासपीठावर बसवून सन्माम।केला. दौऱयासंदर्भात त्यांनी माहिती दिली, डोंबिवलीची ऊर्जा, शक्ती संघटन भावल्याचे ते म्हणाले. देशभरात दौरे सुरू असून एवढी ऊर्जा अन्यत्र कुठेही पहिली नाही, २०२४च्या निवडणुकीत ४४० चा झटका म्हणजे महाविजय मिळवून देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सहकार्य करावे अशी मागणी त्यांनी केली. वोरियर्स काम करतात त्यांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्याना केले.

दरम्यान बावनकुळे यांनी सर्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना सध्याच्या युती सरकारमधील नवरत्नांपैकी एक महत्वाचे रत्न म्हणून सन्मान केला. हजारो डोंबिवलीकर नागरिकांना त्यांनी पंतप्रधान कोण हवे अशी विचारणा केली, त्यावर एक अपवाद वगळता अन्य सगळ्यांनी नरेंद्र मोदी हेच नाव घेऊन मोदींचे समर्थनकेले. मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही भारत माता की जय, हर हर महादेव, हर घर मोदी अशा घोषणा देऊन मोदींचा जयजयकार केला. कार्यकर्त्यानी झपाटून कामाला लागावे आणि बावनकुळे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत रहावे असे म्हंटले.

बावनकुळे, मंत्री चव्हाण यांनी श्रीगणेश मंदिर संस्थान येथे जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले, त्यावेळी विश्वस्त, कार्यवाह प्रवीण दुधे, राहुल।दामले, मंदार हळबे यांच्यासह मान्यवरांनी त्यांचा यथोचित सन्मानकेला. सभेच्या समाप्तीनंतर पत्रकारांनी मराठा युवक पाटील यांची प्रतिक्रिया घेताना पत्रकारांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडुन धकाबुक्की झाल्याचा आरोप पत्रकारांनी केला, त्यानुसार रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी अज्ञात कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली.

 

Web Title: BJP's full support to Chief Minister Eknath Shinde on Maratha reservation issue: Chandrasekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.