‘शून्य कचरा’साठी भाजपाचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:41 AM2018-05-30T00:41:24+5:302018-05-30T00:41:24+5:30
केडीएमसी हद्दीत शून्य कचरा मोहीम राबवण्यासाठी भाजपाच्या महिला आघाडीने पुढाकार घेतला आहे. कचऱ्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पदाधिकाºयांच्या शिष्टमंडळाने सोमवारी आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली.
कल्याण : केडीएमसी हद्दीत शून्य कचरा मोहीम राबवण्यासाठी भाजपाच्या महिला आघाडीने पुढाकार घेतला आहे. कचऱ्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पदाधिकाºयांच्या शिष्टमंडळाने सोमवारी आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली.
भाजपाच्या ठाणे-पालघर महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉ. शुभा पाध्ये, पदाधिकारी संगीता गुंजाळ, निर्मला कदम, रसिका पाटील, ममता परमार, वैशाली ठोसर, सारिका काळे, तृप्ती मोरे, वासंती कुलकर्णी, जया सोनावणे आदी या शिष्टमंडळात होत्या.
कल्याण-डोंबिवलीत कचरा, अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. स्वच्छता राखण्यास महापालिकेला वारंवार अपयश येत आहे. नागरिकांकडून महापालिका विविध प्रकारचे कर वसूल करते. असे असतानाही त्यांनाच कचºयाची विल्हेवाट लावण्याची सक्ती केली जात आहे. परंतु, त्यासाठी प्रशिक्षण व सोयीसुविधा पुरवा, खत कचरा प्रकल्पासाठी सोसायटीच्या आवारात चेंबर बांधा, त्यासाठी शेड उभारण्यासाठी महापालिकेने हातभार लावावा, अशा मागण्या शिष्टमंडळाने केल्या.
शून्य कचरा मोहीम राबवण्यासाठी सोसायट्या पुढाकार घेणार असतील, तर या मागण्यांचा विचार केला जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी या वेळी दिले. ही मोहीम राबवण्यास इच्छुक असलेल्या सोसायट्यांनी तशा स्वरूपाचे प्रस्ताव तयार करून महापालिकेकडे द्यावेत, असेही प्रशासनाने या वेळी सांगितले.
कचरा, डेब्रिज, टपºया हटवल्या
स्वच्छ कल्याण-डोंबिवली मोहिमेंतर्गत कल्याण-शीळ रस्त्यावरील काटईपर्यंत स्वच्छता करण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा असलेला कचरा व डेब्रिज उचलण्यात आले. प्रभाग क्षेत्र अधिकाºयांनी रस्त्यालगत बेकायदा बांधलेल्या ४५ शेड, ४० टपºया, २३ गॅरेज तसेच बेकायदा बॅनर हटवले. रस्त्यालगत डेब्रिज टाकणाºयांकडून मंगळवारच्या कारवाईत तीन हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. या मोहिमेसाठी आठ डम्पर, तीन जेसीबी, सहा घंटागाड्या, १०० कामगार लावले होते. ५० टन डेब्रिज, ७५ टन अतिरिक्त कचरा यावेळी उचलण्यात आला. या वेळी महापौर विनीता राणे तसेच आरोग्य अधिकारी विलास जोशी उपस्थित होते.
वाहने हलवा
रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या गाड्या संबंधित मालक, गॅरेजचालक यांनी बुधवार, २९ मेपर्यंत तेथून हलवाव्यात. अन्यथा, ही वाहने महापालिका, वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या संयुक्त कारवाईदरम्यान उचलली जातील, असा इशारा केडीएमसीने दिला आहे.